Cough syrup : 'कफ सिरप'मुळे १४ मुलांचा मृत्यू, नागपूरमधील विक्री थांबवली

Nagpur cough syrup sample sent for testing विषारी कफ सिरपमुळे मध्य प्रदेश आणि नागपूर परिसरात १४ बालकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर नागपुरात खोकल्यावरील औषधांची विक्री थांबवण्यात आली असून अन्न व औषध प्रशासनाने तपासणी सुरू केली आहे.

Toxic Cough Syrup Kills 14 Children, Sale Halted in Nagpur : नागपुरात खोकल्यावरील काही औषधांची विक्री थांबवण्यात आली आहे. विषारी कफ सिरपमुळे चार राज्यात अनेक बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने हा मोठा निर्णय घेतलाय.. तसेच नागपुरातील खोकल्यावरील औषधांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा आणि परासिया परिसरातील 14 मुलं अत्यवस्थ अवस्थेत नागपुरातील रुग्णालयात दाखल झाली होती. त्यापैकी 8 मुलांचा मृत्यू झाला. तर सध्या चार रुग्ण जीवनरक्षण प्रणालीवर असून दोघे अतिदक्षता विभागात आहेत.

नागपूर आणि लगतच्या मध्य प्रदेशात आलेल्या बालमृत्यू हे आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान बनले आहेत. आरोग्य विभागासोबतच अन्न आणि औषध प्रशासनही सतर्क झालं असून औषध साठ्यांची तपासणी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com