Maharashtra Politics Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : भाजपचा विरोध, महायुतीत वादाचा 'बुरखा'; शिंदेंच्या शिवसेनेला मुस्लिम मतांचा धसका? वाचा

Vishal Gangurde

भरत मोहोळकर, साम टीव्ही

मुंबई : सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, असा आरोप करत ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. मात्र आता शिंदे गटाचे आमदारच मुस्लिम मतांसाठी थेट बुरखा वाटपाचा कार्यक्रम करत असल्याचं दिसतंय.यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.

मुंबईत अरविंद सावंताच्या विरोधात लढणाऱ्या शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा तर 50 हजार मतांनी दारुण पराभव झाला. आमदार यामिनी जाधव यांच्या विधानसभा मतदारसंघात सावंतांना 46 हजार मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे धसका घेतलेल्या यामिनी जाधवांनी आपल्या मतदारसंघातील मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी थेट बुरखा वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. मात्र यामुळे महायुतीतच वाद निर्माण झालाय. कारण भाजपनं या कार्यक्रमाला विरोध दर्शवलाय.

आमदार यामिनी जाधव यांनी त्यांच्या मतदारसंघात मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केले. यावरून महायुतीत नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिंदे गटाच्या कार्यक्रमाला भाजपने विरोध केला आहे. भाजपला असले कार्यक्रम मान्य नाहीत, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिला आहे. तर या वादानंतर आमदार यामिनी जाधव यांनी हा निवडणुकीच्या कॅम्पेनचा भाग असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

या कार्यक्रमामुळे मात्र विरोधकांना आयतं कोलित मिळालंय. मुस्लिमांचा सोयीनुसार वापर केला जातोय, असा आरोप करत ठाकरे गटानं शिंदेंवर निशाणा साधला आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 'सोयीनुसार धर्मांचा वापर केला जातो, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

मुस्लिम व्होट बँकमुळे उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडलं, असा आरोप करणारे शिंदे गटाचे नेते आता काय भूमिका घेणार, असा सवाल विचारण्यात येतोय. कारण भाजपनंही या बुरखा रणनीतीला थेट विरोध दर्शवला आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदेमध्ये संघर्ष रंगण्यापूर्वी महायुतीतच बुरखा वादाचा ठरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ग्रहावर २००० वर्ष जिंवत राहू शकतो व्यक्ती, तुम्हाला याचं नाव माहित आहे का?

Sangli News : जमिनीच्या वादातून फवारले पिकावर तणनाशक; भावविरुद्ध पोलीसात तक्रार

Maharashtra News Live Updates: कॉग्रेस नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी फुंकले विधानसभा निवडणुकीचे रणशिंग

CIDCO Lottery 2024: सिडकोचा दसरा धमाका, 40,000 घरांसाठी लॉटरी? या शहरांत उभी राहणार घरे!

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वाल बनला नंबर 2! नंबर 1 बनण्यासाठी अवघ्या इतक्या धावांची गरज

SCROLL FOR NEXT