"भाजपवाल्यांनो राजभवन गाठा आणि बोम्मई सरकार पाडा" - शिवसेनेचे भाजपला सामनातून आवाहन... Saam Tv
मुंबई/पुणे

"भाजपवाल्यांनो राजभवन गाठा आणि बोम्मई सरकार पाडा" - शिवसेनेचे भाजपला सामनातून आवाहन...

"शिवरायांचा अपमान ही किरकोळ घटना आहे" असं वक्तव्य करत बोम्मई यांनी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या. त्यांच्या या वक्तव्याचाच समाचार शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'तून घेतला आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: कर्नाटक राज्यातील बेंगळूरू येथे काही दिवसांपुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शाही फासत काही समाजकंटकांनी पुतळ्याची विटंबना केली होती. यावरुन राज्यात कर्नाटक (Karnatak) आणि महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात मोठा तणाव निर्माण झाला होता. महाराष्ट्रभरातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला होता. अशाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnatak CM Basavaraj Bommai) यांनी आगीत तेल ओटण्याचं काम केलं. "शिवरायांचा अपमान ही किरकोळ घटना आहे" असं वक्तव्य करत शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या. त्यांच्या या वक्तव्याचाच समाचार शिवसेनेने (Shivsena) आपले मुखपत्र 'सामना'तून (Saamana Newspaper) घेतला आहे. ("BJP people overthrow the Bommai government" - ShivSena appeal to BJP from the saamana)

हे देखील पहा -

सामनातून शिवसेनेने भाजपला (BJP) राजभवन गाठत बोम्मई सरकार पाडण्याचं आवाहन केलं आहे. सामनाच्या अग्रलेखात लिहिलं की, बोम्मई यांना शिवरायांचा अपमान ही घटना किरकोळ वाटते हाही छत्रपतींचा अपमानच आहे. शिवाजी महाराजांना निवडणुकीपूरते वापरून घेतले नंतर सोडले. शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) विश्वासाचे कुठे पानिपत झाले नंतर समजलेच नाही. महाराष्ट्रात काही घडलं की जथेच्या-जथे राजभवनावर पोचतात. कर्नाटक घटनेनंतर हे का होऊ नये? असा सवाल सामनातून उपस्थित केला गेला.

कर्नाटकसारख्या हिंदुत्ववादी देशात शिवरायांचा अपमान होण्याचं कारण काय? पंतप्रधानांनी काशीत मांडलेला विचार चार दिवसनानंतरही बंगरुळात पोचला नाही. काशीत शिवरायांचा सन्मान आणि बंगरुळात अपमान हे चालणार नाही, हे ढोंग आहे अशी जहरी टीका शिवसेनेने केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT