Dipali Sayyad Saam Tv
मुंबई/पुणे

Deepali Sayyad News: दिपाली सय्यद यांचं टेन्शन वाढलं; शिंदे गटात प्रवेशासाठी भाजपचा विरोध, समोर ठेवल्या अटी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : तेलही गेले आणि तूपही गेले... अशी स्थिती दिपाली सय्यद यांची होणार नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण त्यांच्या शिंदे गटातील  (Eknath Shinde)  प्रवेशाला भाजपने विरोध केला आहे. शिवसेना नेत्या दिपाली सय्यद सुद्धा शिंदे गटात प्रवेश करणार आहे. स्वत: दीपाली सय्यद यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

शिंदे गट आणि भाजपची राज्यात युती आहे. मित्रपक्ष या नात्याने दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेशानंतर युतीचा भाग असतील. मात्र शिंदे गटात सामील होण्याआधी दिपाली सय्यद यांनी भाजपाची बिनशर्त माफी मागावी आणि खोट्या तक्रारी मागे घ्याव्यात. भाजपा महिला मोर्चाच्या जनरल सेक्रेटरी दिपाली मोकाशी यांनी ही मागणी केली आहे. (Maharashtra Politics)

काय म्हणाल्या दिपाली मोकाशी?

कथाकथित स्वयंभू नेत्या दिपाली सय्यद या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची बातमी वाचली. सय्यदबाईंना सुबुध्दी येण्यास फारच उशीर झाला. परंतु हरकत नाही. दिपाली सय्यद यांनी याआधी प्रसिद्धीपोटी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर ज्यारितीने आक्षेपार्ह आणि खालच्या शब्दात टीका केली होती. त्याचसोबत राज्यपालांना भेटणाऱ्या भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात खोट्या तक्रारी दिल्या होत्या. यासाठी दिपाली सय्यद यांनी भारतीय जनता पार्टीची माफी मागावी अशी आमची मागणी आहे.

दिपाली सय्यद यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली अशी आमची भावना आहे. त्यामुळे त्या राज्यातील भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युती सरकारला पाठिंबा देण्यासाठी पुढे आल्यात. झालं गेलं विसरून जात दिपाली सय्यद यांनी बिनशर्तपणे पंतप्रधान, उपमुख्यमंत्री यांची माफी मागावी तसेच महिला मोर्चातील पदाधिकाऱ्यांवरील तक्रारी मागे घ्याव्यात अन्यथा त्यांच्या पक्षप्रवेशाला आमचा विरोध असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT