मुंबई : मागील काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात ५० खोक्यांवरून चांगलाच वाद पेटला आहे. शिंदे गटातील (Eknath Shinde) आमदारांनी ५० खोके घेतल्याचा आरोप महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने केला जातोय. यावरून अनेकदा शिंदे गटातील नेते आणि विरोधक आमने-सामने आले. आता तर थेट हा वाद कोर्टात जाण्याची शक्यता आहे.
आपल्यावर खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा शिंदे गटानं दिला आहे. इतकंच नाही तर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर मानहानीचा दावा ठोकू, असा इशाराही शिंदे गटाने दिला आहे.
Sanjay Raut : संजय राऊत तुरुंगाबाहेर येणार? आज जामीन अर्जावर होणार फैसला'पुरावे द्या, दुध का दुध पाणी का होईल'
पहिल्या दिवसांपासून आम्ही आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करणाऱ्या लोकांना सांगतो आहे. तुम्ही खोके घेतल्याचे पुरावे द्या, तुम्ही सिद्ध करा, कुणी खोके घेतले. कसे खोके घेतले. आम्ही आज ४ महिने होत आले हे आव्हान त्यांना देतो आहे, पण ते (विरोधक) स्वीकारत नाहीत. केवळ आम्हाला राजकीय बदनाम करण्याचा प्रयत्न करता आहे, असं शिंदे गटातील मंत्री शंभुराजे देसाई यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात साम टीव्हीसोबत बोलत होते. (Maharashtra Politics)
'आज रात्री आम्ही मुंबईला चाललो आहे. आम्ही याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करू, आमच्यावर होणारी खोक्यांची टीका ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करूनच थांबवावी लागणार आहे. या बाबतीत आम्ही कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊ आणि मग निर्णय घेऊ', असं शंभुराजे देसाई म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असताना, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत थेट गुवाहाटी गाठली. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकासआघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर ५० खोके, एकदम ओके अशी घोषणाबाजी विधिमंडळ पायऱ्यांवरच्या आंदोलनात झाली.
तेव्हापासून शिंदे गटातील आमदारांवर ५० खोक्यांवरून टीकेचं लक्ष्य करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या शिर्डीच्या अधिवेशनात खोक्यांवर टीका केली. त्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांना शिवराळ भाषेत उत्तर दिलं. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण पुन्हा तापलं. त्यानंतर शिंदे गटानं आता कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.