भाजपकडून विकासकामांच्या फलकबाजीचे उघडपणे समर्थन अश्विनी जाधव केदारी
मुंबई/पुणे

भाजपकडून विकासकामांच्या फलकबाजीचे उघडपणे समर्थन

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांच्या विकासकामांवरील नावावरून चांगलीच खडाजंगी

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांच्या विकासकामांवरील नावावरून चांगलीच खडाजंगी झाली, नगरसेवकांच्या फलकबाजीवर Poster राष्ट्रवादीच्या NCP नगरसेवकांनी आक्षेप घेत जोरदार विरोध केला. तर सत्ताधारी भाजपने BJP या फलकबाजीचे चक्क उघडपणे समर्थन केले आहे. पुणे महापालिकेची Pune Corporation सर्वसाधारण सभा काल आणि आज प्रत्यक्ष सभासदांच्या उपस्थितीत पार पडली, शहरातील विकासकामांच्या मुद्द्यावर चर्चा होत असताना नगरसेवकांच्या फलकबाजी या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली, यावेळी शहरातील विकासकामं होणं गरजेचं आहे.

हे देखील पहा -

मात्र एकाच कामाच्या ठिकाणी 3 ते 4 नगरसेवक फलक लावतात, एकाच ठिकाणी पुन्हा पुन्हा काम करुन बिले काढतात, भाजपच्या नगरसेवकांची फलकबाजी म्हणजे पुणेकर जनतेची फसवणूक आहे, तसेच पूर्वीही विकासकामं होतीच पण या विकासकामांना राजकीय रंग नव्हते, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

तर नागरिकांसाठी आम्ही विकासकामे करतो, त्यांना कळायला हवे आपल्या भागात लोकप्रतिनिधींनी काय कामे केली आहेत. भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे फलक अधिक दिसणारच, यापुढेही असेच चित्र दिसेल त्याची सवय करुन घ्या आणि ज्या पक्षाने संधी दिली, त्या पक्षाचा रंग आणि चिन्ह आम्ही लावणारच असा टोला सत्ताधारी भाजपने विरोधकांना लगावला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT