मावळात पवना शिक्षण संकुलाच्या शिक्षक आपल्या दारी उपक्रम कौतुकास्पद

पवनानगर येथील शिक्षकांचे वाड्या वस्त्यांवर जाऊन ज्ञानदानाचे कार्य
मावळात पवना शिक्षण संकुलाच्या शिक्षक आपल्या दारी उपक्रम कौतुकास्पद
मावळात पवना शिक्षण संकुलाच्या शिक्षक आपल्या दारी उपक्रम कौतुकास्पददिलीप कांबळे
Published On

मावळ - कोरोनाच्या Corona प्रादूर्भावामुळे गेल्या दिड वर्षापासून शाळा बंद असून ऑनलाईन Online शिक्षण सुरु आहे. सर्वच विद्यार्थी या ऑनलाईन प्रवाहात नसल्याने नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलाच्या वतीने एक नाविन्य पूर्ण उपक्रम 'शिक्षक आपल्या दारी' राबवत असून पवनमावळातील धालेवाडी, मालेवाडी,आंबेगाव,तिकोणा पेठ सारख्या दुर्गम भागात शिक्षक विद्यार्थ्यांच्या गावात जाऊन ज्ञानदानाचे कार्य सुरु केले आहे.

कोरोनामुळे विद्यार्थी व शिक्षक भेटू शकत नव्हते गेल्या एक वर्षा पासून ऑनलाईन शाळा चालू होती. परंतु आता ऑनलाईन तासाचा देखील मुलांना कटाळा येत असून त्यातच पवनानगर हा भाग ग्रामीण भाग असल्याने नेटवर्कची समस्या त्यातच काही पालकांची बेताची परिस्थिती मुलं देखील मालेवाडी,धालेवाडी अशा डोंगराच्या पायथ्याशी असल्याने अनेक मुलांचा शाळेशी संबध तुटला होता.

हे देखील पहा -

नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे यांच्या लक्षात ही बाब आल्याने विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाही. परंतु शिक्षक त्यांच्या घरी जाऊन त्यांना शिकवू शकतो. या संकल्पनेतून व पवना नगर येथील पवना विद्यालयातील शिक्षकांच्या सहकार्याने इयत्ता पाचवी ते आठवी शिकविणारे शिक्षक शाळेच्या परिसरातील गावात तसेच दुर्गम असणार वाड्या वस्त्यांवर जाऊन मंदिर व मोकळ्या जागेत कोरानाचे नियम पाळत विद्यार्थांना एकत्र करत 'शिक्षक आपल्या दारी' उपक्रमाची सुरवात करत विद्यार्थांना शिक्षणाचे धडे देण्यास सुरवात केली आहे.

मावळात पवना शिक्षण संकुलाच्या शिक्षक आपल्या दारी उपक्रम कौतुकास्पद
औरंगाबाद, नाशिकसह महाराष्ट्राला पावसाने झोडपलं

या स्तुतीपूर्ण उपक्रमामुळे शिक्षक आपल्या गावात आपल्याला शिकवण्यासाठी आले आहेत हे पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर देखील वेगळाच आनंद दिसून येत होता. तसेच संस्थेची व शिक्षकांची आपल्या विद्यार्थ्यांंनी शिक्षणापासून वंचित राहु नये या साठी करत असलेली धडपड पाहून पालक देखील या उपक्रमाचे कौतुक करत आहेत. उत्कृष्ट नियोजनामुळे हा उपक्रम यशस्वी होण्यास मदत होत आहे. असा उपक्रम महाराष्ट्रातील इतर दुर्गम भागात देखील राबविला जावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com