Ashish Shelar Saam Tv
मुंबई/पुणे

BMC Budget 2023 : 'मुंबई महापालिकेचे बजेट कट कमिशन आणि कंत्राटदारांचे नसून...'; आशिष शेलार यांची पहिली प्रतिक्रिया

भाजपचे मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Ashish Shelar News : भाजपचे मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'गेल्या पंचवीस वर्षात कंत्राटदार सांगेल तीच कामे आणि कंत्राटदार सांगेल तेच बजेट असे जे चित्र होते. अखेर ते अखेर बदलले आहे. मुंबई महापालिकेचा यावर्षीचा अर्थसंकल्प मुंबईकरांच्या मागण्या, अपेक्षा मागवून त्यानुसार तयार करण्यात आल्या आहे. त्यामुळे हे बजेट कट कमिशन आणि कंत्राटदारांचे नसून मुंबईकरांचे आहे, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली. (Latest Marathi News)

आशिष शेलार (Ashish Shelar) पुढे म्हणाले, 'मुंबईतील हवा प्रदूषण धोक्याची पातळी ओलांडून गेली आहे. त्यामुळे याबाबत तातडीने उपाय योजना करा, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही केली होती. त्यानुसार त्यांनी तातडीने पालिका आयुक्तांना सुचना केल्या होत्या. त्यामुळे यावेळी प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी अर्थसंकल्पात तब्बल १५०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली. त्याचे आम्ही स्वागत करतो'.

'मुंबईकरांना (Mumbai) चालण्यासाठी फुटपाथ देणे ही पालिकेची जबाबदारी मान्य करुन ९ मीटर पेक्षा मोठ्या प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ देण्याची भूमिका पालिकेने घेतली. त्याचे मुंबईकरांच्या वतीने स्वागतच आहे. नवे संकल्प केलेले नाहीत त्यामुळे काही अपेक्षा आमच्या अजूनच्या होत्या. पण करवाढ मुंबईकरांवर लादली नाही. रस्ते, आरोग्य, कोस्टलरोड, मलजल नित्सारण,अशा पायाभूत सेवा सुविधांना केलेली तरतूद ही जमेची बाजू आहे, असेही आशिष शेलार पुढे म्हणाले.

'दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तृतीय पंथीय यांचा संवेदनशीलपणे अर्थसंकल्पात विचार केला गेला आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे कंत्राटदारांच्या मर्जीतला हा अर्थसंकल्प नसून मुंबईकरांच्या मागणीतला अर्थसंकल्प आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : महाराष्ट्रात तुम्हाला मराठी बोलावंच लागेल, मराठी येत नसेल तर...; योगेश कदमांचा इशारा

Laxman Hake: भटक्या कुत्र्यासारखी हालत करू, महाराष्ट्रात फिरू देणार नाही; राष्ट्रवादी काँग्रेसचा लक्ष्मण हाकेंना इशारा

Shubman Gill double century : कॅप्टन असावा तर असा! शुभमन गिलनं इग्लंडला दमवलं, झळकावलं द्विशतक

Accident News: कार ६० फूट खोल ओढ्यात कोसळली, मुंबई-गोवा महामार्गावर थरारक घटना, पाहा,VIDEO

Sharad Pawar : खडकवासला धरण, कात्रज बोगदा ते तथाकथित पुणेकरांनी दिलेला त्रास; शरद पवार महात्मा फुलेंवर काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT