BJP Politics Saam tv
मुंबई/पुणे

मुंबईत येऊन ठाकरे बंधूंना भेटणार; भाजप BMC मध्ये वरचढ ठरताच खासदार निशिकांत दुबे यांचं आव्हान

BMC Election : मुंबईत येऊन ठाकरे बंधूंना भेटणार असल्याचं आव्हान खासदार दुबेंनी आव्हान दिलं आहे. भाजप खासदाराच्या आव्हानानंतर ठाकरे बंधू काय प्रतिक्रिया देणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Vishal Gangurde

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होऊ लागले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल देखील जाहीर होऊ लागले आहेत. महापालिकांच्या निकालामध्ये भाजपचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. यामुळे भाजप आणि शिंदे गटामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मुंबईत ठाकरे गट २५ वर्षांची सत्ता गमावताना दिसत आहे. यादरम्यान ठाकरे बंधूंना मोठा झटका बसल्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोठं आव्हान दिलं आहे.

मुंबईत भाजपने सत्ता काबिज करण्याकडे वाटचाल करताच खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंवर टीका करणे सुरू केले आहे. निशिकांत दुबे यांनी 'एक्स'वर पोस्ट करत ठाकरे बंधूंवर टीका केली. खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरेंच्या घराणेशाहीला लक्ष्य केलं आहे. मी मुंबईत येऊन उद्धव आणि राज ठाकरेंना भेटणार असल्याचते दुबेंनी आव्हान दिलं.

राज ठाकरेंनी केली होती खासदार दुबेंवर टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेवरून मनसैनिकाने अमराठी दुकानदाराला केलेल्या मारहाणीचं समर्थन केलं होतं. त्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. 'हिमंत असेल तर उर्दू किंवा दक्षिण भारतीय भाषिकांना मारून दाखवा. उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये आल्यानंतर आपटून आपटून मारू, असं आव्हान खासदार दुबेंनी दिलं होतं. याच दुबे यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक महापालिकांवर भाजप आघाडीवर येत असताना ठाकरे बंधूंना लक्ष्य केलं आहे. भाजप खासदाराच्या टीकेला ठाकरे बंधू्ंकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, हे पाहावे लागेल.

तत्पूर्वी, मुंबईत महायुती १२५ जागांवर आघाडीवर आहे. तर मुंबईत सत्तास्थापनेसाठी बहुमत आकडा ११४ इतका आहे. ठाकरे बंधू ७५ जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेस १५ जागांवर आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. पालिकेचा अधिकृत निकाल येण्याआधी खासदार दुबे यांनी ठाकरे बंधूंना आव्हान दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Tourism : साताऱ्यातील 'हे' तलाव जणू मिनी काश्मीर, हिवाळ्यात बहरतो निसर्ग

Pune Municipal Corporation Results: पुणे महापालिकेत भाजच बनला 'बाजीराव'; वाचा विजयी उमेदवारांची यादी

Sanjay Raut on BMC Election: भाजप ५१, ठाकरे ४९, अजून ६०-७५ जागांचा निकाल बाकी, ठाकरेंना अजूनही विश्वास

Khandeshi Vada Recipe: खान्देशी स्टाइल उडदाच्या डाळीचे कुरकरीत वडे कसे बनवाल? वाचा सिक्रेट रेसिपी

Open Hair Hairstyle: पार्टी ते कॅज्युअल लूकसाठी करा या खास ट्रेंडी हेअसस्टाईल, मिळेल क्लासी आणि अट्रॅक्टिव्ह लूक

SCROLL FOR NEXT