Iran Vs Israel War: दुबईच्या जेबेल अली एअर बेसवर हल्ला, एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

Israel-Iran War Update: इराण-इस्राइलमध्ये युद्ध पेटलं. दुबईच्या जेबेल अली एअर बेसवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला.

इराण आणि इस्राइलमधील युद्ध पेटलं आहे. दोन्ही देशांमध्ये तणावाचे आणि भीतीचे वातावरण आहे. इस्राइलने इराणच्या ३० ठिकाणांवर हल्ले केले. त्यानंतर इराणने देखील चोख प्रत्युत्तर देत हल्ले केले. इराणने दुबईतील जेबेल अली आणि सौदीच्या प्रिन्स सुलतान एअर बेसवर भीषण क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे अबु धाबीमध्ये एका भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. रियाधमध्ये अनेक स्फोट झाले आहेत. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय.

इराण-इस्राइलमधील युद्धादरम्यान जॉर्डनमधील भारतीयांना देश सोडण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दुतावासाकडून जॉर्डनमधील भारतीय नागरिकांना देश सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या इस्राइल- इराण युद्धादरम्यान नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरूच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com