Pune Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुणे हादरलं! भाजप आमदाराच्या मामाची हत्या; पहाटे झालं होतं अपहरण

Pune Crime News : पुण्याला हादरवणारी घटना घडली आहे. भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांची अपहरण करून हत्या करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, साम टीव्ही

पुणे : पुण्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला आहे. भाजप आमदाराच्या मामाच्या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे. पुण्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत टिळेकर यांचे मामा वाघ यांचा मृतदेह सापडला आहे. या घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सतीश वाघ यांचे आज सोमवारी पहाटे अपहरण झालं होतं.

सतीश वाघ हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होत. आमदार टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे शेवाळवाडीतून अपहरण झालं. आज सकाळच्या सुमारास सतीश वाघ यांच्या समोर सोलापूर रस्त्यावरील हॉटेलसमोर थांबले होते. त्यावेळी एका चारचाकी गाडीतून त्यांचं अपहरण करण्यात आलं. चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी सतीश वाघ यांचं अपहरण केलं होतं.

सतीश वाघ हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होत. आमदार टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे शेवाळवाडीतून अपहरण झालं. आज सकाळच्या सुमारास सतीश वाघ यांच्या समोर सोलापूर रस्त्यावरील हॉटेलसमोर थांबले होते. त्यावेळी एका चारचाकी गाडीतून त्यांचं अपहरण करण्यात आलं. चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी सतीश वाघ यांचं अपहरण केलं होतं.

सतीश वाघ यांच्या अपहरणानंतर या प्रकरणी पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. वाघ यांच्या मुलाने अपहरणाची तक्रार दिली होती. वाघ यांचं सोलापुरातील ब्लू बेरी हॉटेलसमोरू अपहरण झालं होतं. अपहरण करून सतीश वाघ यांना सोलापूरच्या दिशने अपहरणकर्ते घेऊन गेले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पोला धडक; ४ जीवलग मित्रांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

Bridal Look Care: या ५ चुकांमुळे नेहमी खराब होतो ब्राइडल लूक...; तुमचं लग्न जर यावर्षी ठरलं असेल तर घ्या ही काळजी

Ginger Garlic Paste: मीठ आणि तेल वापरून बनवा आलं- लसूणाची पेस्ट, दिर्घकाळ टिकेल

SCROLL FOR NEXT