MLA Yogesh Tilekar : मॉर्निंग वॉकच्या वेळी हॉटेल समोर थांबले अन्.. , भाजप आमदाराच्या मामाचं अपहरण; हडपसर परिसरात खळबळ

MLA Tilekar Uncle Kidnapped : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं पुण्याच्या शेवाळ वाडीतून अपहरण करण्यात आलं आहे. याघटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
Yogesh Tilekar
Yogesh TilekarSaamTv
Published On

पुणे : विधान परिषदेचे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण झालं आहे. सतीश वाघ असं त्यांच्या मामाचं नाव आहे. शेवाळ वाडीतून हे अपहरण झालं. सोमवारी (दि. ०९) सकाळच्या सुमारास वाघ यांच्या सोलापूर रस्त्यावरील हॉटेल समोर थांबले असता एका चारचाकी गाडीतून त्यांचं अपहरण झालं. या प्रकरणी पोलीसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

योगेश टिळेकर हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांचे मामा सतीश वाघ (वय ५८, रा. फुरसुंगी फाटा, आकाश लॉन शेजारी, ब्ल्यूबेरी हॉटेल शेजारी, मांजरी फॉर्म) हे सोमवारी सकाळी सोलापूर रस्त्यावरील ब्लु बेरी हॉटेलसमोर थांबले होते. यावेळी एक क्रीम कलरची शेवरलेट एन्जॉय गाडी त्या ठिकाणी आली. या गाडीतील तीन ते चार इसमांनी वाघ यांना जबरदस्ती करत गाडीत बसवले.

Yogesh Tilekar
Maharashtra Politcs : महायुतीच्या माजी मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार; कोणाचा पत्ता कट होणार?

या गाडीत चौघे जण असल्याची माहिती समोर आली आहे. सदर गाडी सोलापुरच्या दिशेने गेली असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं आहे. वाघ यांच्या मुलाने अपहरणाची तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावर तपास अधिकारी व पथक तपास करीत आहेत.

Yogesh Tilekar
Thane Crime : ऑन ड्युटी पोलिस कर्मचाऱ्यानं आयुष्य संपवलं, मुरबाड पोलिसांत खळबळ

दरम्यान, पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी या प्रकरणी बोलताना सांगितले की, सकाळी आम्हाला घटनेची माहीती मिळाली. त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. अपहरणात चार लोक सहभागी होते. सोलापुरच्या दिशेने अपहरणकर्ते गेले आहेत. आम्ही तपासासाठी पथके नियुक्त केली आहेत. अपहरणाचे कारण कळलेले नाही किंवा कुटुंबियांनी कोणावर संशय व्यक्त केलेला नाही. मात्र या प्रकरणाचा आम्ही लवकरच छडा लावु, असं त्यांनी सांगितलं.

Edited By Rakhi Rajput

Yogesh Tilekar
Raj Thackeray : वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभाराने लोकांमध्ये दहशत; राज ठाकरेंनी महायुती सरकारकडे केली पहिली मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com