Mahrashtra Politics Saam tv
मुंबई/पुणे

Mahrashtra Politics: ठाकरे गटाच्या बालेकिल्यात भाजपचा 'दांडिया'; नवरात्रोत्सवात रंगणार राजकीय गरबा

Mahrashtra Politics: निवडणुका डोळ्यासमोर असताना विविध पक्षांनी मुंबईत ठिकठिकाणी गरबाचे आयोजन केले आहे.

सूरज सावंत

Maharashtra Political News:

आजपासून शारदीय नवरात्रौत्सव धूमधडाक्यात सुरू झाला आहे. रंगाची उधळण आणि दांडिया हे नेहमीच नवरात्रीचे आकर्षण ठरले आहे. यामध्ये राजकारणी तरी मागे कसे राहतील? निवडणुका डोळ्यासमोर असताना विविध पक्षांनी मुंबईत ठिकठिकाणी गरबाचे आयोजन केले आहे. (Latest Marathi News)

भाजपने तर ठाकरेंच्या मुंबईतील बालेकिल्ल्यातील मैदानं ही कुणाच्याही न कळत, गरब्यासाठी एक महिना आधिच बुकींग करून ठेवल्याची माहिती मिळते.

19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर रोजी ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अभ्युदय नगर काळाचौकी या मुंबईच्या भागात भाजपने दांडिया महोत्सव आयोजित केला आहे.

'उत्सव आदिशक्तीचा, जागर मराठी मनाचा' असे म्हणत शहीद भगतसिंग मैदानात हा दांडिया महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. अर्थातच काळाचौकी हा शिवसेना ठाकरे गटाचा गड मानला जातो.

गेली कित्येक वर्ष या विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचा उमेदवार निवडून येत आहेत. मात्र सत्तातरानंतर शिवसेनेत पडलेल्या फुटीचा फायदी घेत भाजपने आता शिवसेनेच्या या बाले किल्ल्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे.

भाजपने सणांच्या पार्श्वभूमीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, आयोजित करत येथील स्थानिक नागरिकांना आकर्षित करत आपल्याकडे वळवण्यास सुरूवात केलेली आहे. यावर ठाकरे आपला गड कसा राखून ठेवतात त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.

वरळी पाठोपाठ काळाचौकी, दादर या भागांमध्ये जिथे शिवसेनेचं वर्चस्व आहे. या ठिकाणी गरब्या निमित्ताने भाजपने 'उत्सव आदिशक्तीचा, जागर मराठी मनाचा' या महोत्सवाचा आनंद घेण्याचं आवाहन भाजपकडून करण्यात आले आहे.

शुक्रवारी 19 ऑक्टोबरपासून हा दांडिया महोत्सव सुरू होणार असून 23 ऑक्टोबरपर्यंत चालणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्यावर्षी या दांडियाला अनेक सुपरस्टार अभिनेत्यांनी हजेरी लावली होती. यात रणवीर सिंहच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा रंगली होती. यावर्षीच्या दांडीयाला नक्की कोणता सुपरस्टार येणार या बद्दल उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT