Solapur Political News: सोलापुरात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भीम आर्मी आक्रमक, काळे झेंडे दाखवण्याचा केला प्रयत्न

Solapur Political News: भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडा दाखवण्याचा प्रयत्न करत जोरदार घोषणा दिल्याचा प्रकार घडला आहे.
Solapur Political News:
Solapur Political News:Saam tv
Published On

Chandrakant Patil News:

राज्यात कंत्राटी भरतीवरून राज्याचं राजकारण तापलं आहे. कंत्राटी भरतीवरून विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे. याच कंत्राटी भरतीच्या विरोधात भीम आर्मी या संघटनेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ सोलापुरातील भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडा दाखवण्याचा प्रयत्न करत जोरदार घोषणा दिल्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी या कार्यकर्त्याला तातडीने ताब्यात घेतले. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री चंद्रकांत पाटील यांची काही दिवसांपूर्वी सोलापूरच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली. यामुळे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोलापूरला आले होते. त्यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. अजय मैंदर्गीकर असे या भीम आर्मीच्या कार्यकर्त्याचे नाव आहे.

Solapur Political News:
MP Assembly Election: मध्य प्रदेशात भाजपला मोठा धक्का, ऐन निवडणुकीत 'या' बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ

नेमकं काय घडलं?

सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकात पाटील कारमधून उतरले. त्यानंतर भीम आर्मीचा कार्यकर्ता अजयने त्यांना काळा झेंडा दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने खासगीकरण रद्द करा, अशा घोषणा देखील दिल्या. तसेच त्याने शाही फेकण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले.

सरकारी नोकऱ्यांमध्ये कंत्राटी पद्धत आणली जात आहे. या माध्यमातून आरक्षण संपविण्याचा डाव सरकार आखत असल्याचा आरोप भीम आर्मीने केला आहे.

काही दिवसांपूर्वी धनगर समाजाच्या कार्यकर्त्याकडून सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला होता.

Solapur Political News:
Navi Mumbai Fire: नवी मुंबईत सात मजली इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाचे ५ अग्निबंब घटनास्थळी

तत्पूर्वी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या वर्षी महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. त्याच्या निषेधार्थ पुण्यातील एका तरुणाने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली होती. दरम्यान, त्यांच्या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com