Manoj Jarange Patil Hunger Strike in Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

Manoj Jarange News: मनोज जरांगेंना तत्काळ अटक करा, भाजपच्या बड्या नेत्याची मागणी; विधानपरिषदेत काय घडतंय?

Maratha Reservation News: राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतरही महाराष्ट्रात हिंसक आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना तत्काळ अटक करा, अशी मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आज (२७ फेब्रुवारी) विधानपरिषदेत केली.

Satish Daud

Manoj Jarange Patil News

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून सगेसोयरे अध्यादेशावर कायदा करा, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर मराठा समाजाने राज्यभरात आंदोलने केली. काही ठिकाणी या आंदोलनाला गालबोट देखील लागलं. या आंदोलनाचे तीव्र पडसाद विधानसभा तसेच विधानपरिषदेतही उमटले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजप नेते आशिष शेलार यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांना तत्काळ अटक करा, अशी थेट मागणी प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली. (Latest Marathi News)

राज्य सरकारने मराठा समाजाला (Maratha Reservation) स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतरही महाराष्ट्रात हिंसक आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना तत्काळ अटक करा, असं म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर मनोज जरांगेविरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. यामुळे सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला.

राज्यात अशांतता आणि अराजकता पसरवली जात आहे असं सांगत हा कट रचण्यामागचा सूत्रधार शोधून काढायला हवे, तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करून एसआयटी मार्फत चौकशी करावी, असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलार यांची ही मागणी मान्य केली आहे.

मनोज जरांगे यांच्या पाठीमागे कुणाचा हात आहे, हे आम्ही शोधून काढू असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील जरांगे यांची एसआयटी चौकशी होणार, यावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT