Chitra Wagh, Chandrakant Patil Saam tv
मुंबई/पुणे

Chitra Wagh News: चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांची थेट महात्मा फुलेंशी तुलना; म्हणाल्या...

भाजप नेत्या चित्रा वाघ पुण्यातील एका कार्यक्रमात केलेल्या अजब विधान केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Chitra Wagh News : भाजप नेत्या चित्रा वाघ पुण्यातील एका कार्यक्रमात केलेल्या अजब विधान केलं आहे. चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी केली आहे. 'तुम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. माञ चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांच्या सारख्या ज्योतिबांचा शोध जारी आहे', असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा फुले यांच्याशी केली आहे. (Latest Marathi News)

पुण्यात भाजपने सन्मान स्त्री शक्तीचा मकरसंक्रांती निमित्त हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात भाजप महिला पदाधिकारीही उपस्थित होते. या कार्यक्रमात स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

या कार्यक्रमात चित्रा वाघ यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. त्यावेळी चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा फुले यांच्याशी केली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, 'जितक्या महिलांच्या चळवळी झाल्या. त्याचं महत्वाचं केंद्र पुणे आहे. आजचीही नवीन सुरुवात येथून झाली आहे. मी नेहमी म्हणत असते, आम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. माञ चंद्रकांत पाटील आणि हेमंत रासने यांच्या सारख्या ज्योतिबांचा शोध जारी आहे'.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील आणि हेमंत रासने यांची तुलना थेट महात्मा फुले यांच्याशी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या कार्यक्रमानंतर चित्रा वाघ प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उर्फी जावेदच्या कपड्यावर भाष्य केलं. 'माझा विरोध हा कुठल्या महिलेला किंवा तिच्या धर्माला नव्हताच आणि नाही. तो विरोध विकृतीला होता, पण आता कौतुक केलं पाहिजे. कारण ती महिला आता पूर्ण कपड्यांमध्ये दिसते आहे. कोण सुधारत असेल तर त्याचे कौतुक पण केले पाहिजे'.

'तिने काही ठरवले असेल, कारण ती आता चांगल्या कपड्यांमध्ये दिसतेय. मला अनेक जण फोटो पाठवत आहेत. त्यामध्ये ती चांगले कपडे घालते आहे, तिचं कौतुक केलं पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे की बाई कपडे घाल आणि फिर', असे चित्रा वाघ पुढे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

MSRTC: शिवशाही बस आता नव्या अवतारात येणार; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूदरात लक्षणीय घट; सरकारचे कोणते उपाय ठरताहेत गेम चेंजर?

खाण उपसंचालकावर व्हिजिलन्सची धाड, अधिकाऱ्याच्या घरात नोटांच्या थप्या

कर्जफेडीसाठी 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या, विरोधक आक्रमक, अधिवेशनात पडसाद

SCROLL FOR NEXT