Ajit Pawar: 'लव्ह जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याच काम...' अजित पवारांचा हल्लाबोल

राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती जातीत तेढ निर्माण केली जात आहे, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSaam TV

विजय पाटील..

Sangali: लव्ह जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याच काम सुरू आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती जातीत तेढ निर्माण केली जात आहे, मात्र आज जे समाजात सुरू आहे त्याच्या विरोधात ज्या प्रमाणात उठावा व्हायला पाहिजेल होता तसा तो होताना दिसत नाही, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला आहे. (Ajit Pawar)

Ajit Pawar
Amit Thackeray: हम भी कुछ कम नहीं.! अमित ठाकरेंच्या भेटीनंतर उदयनराजेंची फटकेबाजी; 'ही' खास वस्तू दिली भेट

सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे क्रांतिवीरांगना इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले अजित पवार..

"क्रांतीविरागणा इंदूमती पाटणकर यांनी स्वातंत्रलढ्या बरोबरच जाती अंताचा लढा उभा केला, त्याकाळी त्यांनी अनेक आंतरजातीय विवाह लावून दिले होते. आता सुद्धा याच भूमीतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दोन्ही मुलांनी आंतरजातीय विवाह केले आहेत," असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Pakistan Bus Accident: पाकिस्तानात बसला भीषण अपघात; 39 जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

त्याचबरोबर पुढे बोलताना "अलीकडे सेक्युलर हया शब्दालाच कुठेतरी तिलांजली देण्याचा प्रयत्न काही जण करतात. हे आपल्या भारताच्या दृष्टीने अतिशय अडचणीचं होणार असल्याचेही" अजित पवार म्हणाले..

पहाटेच्या शपथविधीवर काय म्हणाले अजित पवार...

"प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नंतर एक स्टेटमेंट करून त्याच्यावर पडदा टाकलेला आहे.. सारखं सारखं ते उगाळू नका.. त्याला तीन वर्षे झालेली आहेत, त्यापेक्षा आपण महागाई बेरोजगारी आत्ताचे जे काही प्रश्न यक्ष प्रश्न निर्माण झालेले त्याच्याबद्दल या मीडियाचाही वापर करून आणि लोकांना जागृत करू," असे म्हणत पहाटेच्या शपथविधीवर बोलणे टाळले. (Sangali News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com