sharad pawar and chandrashekhar bawankule  saam tv
मुंबई/पुणे

Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar: 'ज्यांना राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही त्यांनी मोदींवर बोलू नये', चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा

Priya More

Chandrashekhar Bawankule News: 'मोदीजी पुन्हा येणार नाहीत' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपवर (BJP) टीका करणाऱ्या शरद पवारांना (Sharad Pawar) राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.'ज्यांना राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही त्यांनी मोदींवर बोलू नये', अशा शब्दात बावनकुळे यांनी पवारांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी पवारांनी ‘घमंडीया‘ ची मोट बांधण्याचा प्रयत्न केला तरीही २०२४ मध्ये जनता मोदींना साथ देणार असल्याचे देखील स्पष्टपणे सांगितले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'ज्या शरद पवार यांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही ते पवारसाहेब आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका करीत आहेत. पवारसाहेब तुम्ही राजकारण करताना कायम साडेतीन जिल्ह्यांचाच विचार केला आणि आज भाजप देशभरात कुठल्या राज्यात आहे आणि कुठल्या राज्यात नाही हे गणित सांगत सुटला आहात.'

'मोदीजी पुन्हा येणार नाहीत असं भाकीत तुम्ही केलं पण तुमचं हे भाकीत खरं होणार नाही. कारण जनता मोदीजींच्या पाठीशी कालही होती आणि आजही आहे.', असं म्हणत त्यांनी शरद पवारांना टोला लगावला. 'समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम कुणी केलं हे महाराष्ट्रातील जनतेनं तुमचं सरकार असताना पाहिलंय. त्यामुळे मोदीजींकडे बोट दाखवण्यापूर्वी एकदा आपली कारकीर्द तपासून बघा.', अशा शब्दात त्यांनी पवारांवर निशाणा साधला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढे सांगितले की, 'बाकी परिवार बचाव पार्टीला सोबत घेऊन तुम्ही कितीही ‘ घमंडीया‘ ची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. तरीही देशातील जनता २०२४ मध्ये सुद्धा मोदीजी आणि भाजपला साथ देईल. याबाबत आपण निश्चिंत राहावे.', असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT