Chhagan Bhujbal Meets Nawab Malik: आमच्या दोघांच्या डिग्री सारख्याच, रिटर्न फ्रॉम जेल; नवाब मलिकांच्या भेटीनंतर भुजबळांची मिश्किल टिप्पणी

Nawab Malik News: नवाब मलिक हे तुरुंगातून घरी आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन्ही गटाचे नेते त्यांची भेट घेत आहेत.
Chhagan Bhujbal Meets Nawab Malik
Chhagan Bhujbal Meets Nawab MalikSaam Tv

Chhagan Bhujbal News: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी आज माजी मंत्री आणि आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांची निवासस्थानी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला असून ते सध्या तुरुंगाबाहेर आहेत.

नवाब मलिक हे तुरुंगातून घरी आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन्ही गटाचे नेते त्यांची भेट घेत आहेत. अशामध्ये आज छगन भुजबळ यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी 'आमच्या दोघांच्या डिग्री सारख्या रिटर्न फ्रॉम जेल', अशी मिश्किल टिप्पणी केली आहे.

Chhagan Bhujbal Meets Nawab Malik
Cabinet Meeting Big Decision: विश्वकर्मा योजना आणि रेल्वेच्या 7 प्रोजेक्टला मंजुरी, कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले महत्वाचे निर्णय

छगन भुजबळ यांनी सांगितले की, 'छगन भुजबळ आमचे सहकारी आहेत. आमच्या दोघांच्या डिग्री सारख्याच आहेत रिटर्न फ्रॉम जेल. मलिकांना किडनीचा प्रॉब्लेम आहे. जेलमध्ये असे त्रास सहन करणे खूप मोठ असतं. न्यायदेवतेने त्यांचं ऐकलं. तब्येत सांभाळा असं मी त्यांना सांगितलं असल्याचे भुजबळांनी सांगितले.

यावेळी छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की,'आमची पार्टी एकच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकच आहे. पवारसाहेब पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतच आहेत. ठीक आहे कदाचित ते रागाने म्हणाले असतील पण मला याचं काही वाटत नाही.'

Chhagan Bhujbal Meets Nawab Malik
NCP Political Crisis: शरद पवार, अजित पवारांना उत्तर देण्यासाठी आणखी ३ आठवड्यांची मुदत

तसंच,'मंत्रालयात मी पण पवार साहेबांचा मोठा फोटो लावला आहे पवारसाहेब तरी कुठे कुठे फोटो काढण्यासाठी जाणार ते आमचे नेते आहेत आणि आम्ही प्रेमाने त्यांचे फोटो लावतो. प्रेमाने आणि आस्थेने कोणाचा फोटो लावणं हा गुन्हा आहे असं मला वाटत नाही. भाजपसोबत न जाण्याची भूमिका ही त्यांची पहिल्यापासून आहे.' असं देखील त्यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal Meets Nawab Malik
Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar: 'ज्यांना राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही त्यांनी मोदींवर बोलू नये', चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा

नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाला पाठिंबा देणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. अशामध्ये 'मी त्यांना सांगितलं की आधी चांगल्या हॉस्पिटलमध्ये जा आणि नीट व्हा आणि मग बघू काय करायचे ते.', असे छगन भुजबळ यांनी सांगितले. तसंच त्यांनी विजय वड्डेटीवारांवर देखील टीका केली आहे. 'नरेंद्र मोदी कधी सांगायला गेले वड्डेटीवारांना . काहीही संबध नाही.उगाच मनात आल की बोलायचं.', अशी टीका त्यांनी केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com