NCP Political Crisis: शरद पवार, अजित पवारांना उत्तर देण्यासाठी आणखी ३ आठवड्यांची मुदत

NCP Political Crisis: आज शरद पवार गटाने उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाकडे ४ आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने ८ सप्टेंबरपर्यंत दोन्ही गटाला मुदतवाढ दिली आहे.
Maharashtra NCP Crisis
Maharashtra NCP Crisissaam tv
Published On

NCP Political News: राज्याच्या राजकारणात मोठं वृत्त हाती आलं आहे. राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार अशा दोन्ही गटाचा वाद निवडणूक आयोगात पोहोचला आहे. आज शरद पवार गटाने नोटीसला उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोगाकडे ४ आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने उत्तर देण्यासाठी ८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्यासाठी निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. अजित पवार गटाने दावा करण्यासाठी 40 आमदारांचं सही असलेलं पत्र निवडणूक आयोगाला दिलं होतं.

Maharashtra NCP Crisis
Beed Political News: शरद पवारांनी बैठक घेताच बीडमधील राजकारण फिरलं; बीआरएस राज्य समन्वयकांनी दिला राजीनामा

दरम्यान, निवडणूक आयोगाने २७ जुलै रोजी अजित पवार आणि शरद पवार गटाला नोटीस धाडली होती. या दोन्ही गटाला १७ ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास मागितले होते.

Maharashtra NCP Crisis
Cabinet Meeting Big Decision: विश्वकर्मा योजना आणि रेल्वेच्या 7 प्रोजेक्टला मंजुरी, कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले महत्वाचे निर्णय

तत्पूर्वी, शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला मेल केला होता. त्यात अजित पवार गटाने कोणती कागदपत्रे दिली आहेत, त्याची यादी मागितली होती. त्यानंतर आम्ही उत्तर देता येईल, अशा आशयाचा मेल केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना ८ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

शरद पवार गट उद्या उत्तर देणार नव्हते, कारण...

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्या निवडणूक आयोगाला उत्तर सादर करणार नव्हता. कारण शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे ४ आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला होता. अजित पवार यांच्या गटाने कोणती कागदपत्र दिली आहेत त्यांची यादी द्या म्हणजे त्यावर आम्हाला उत्तर देता येईल, अशा आशयाचा मेल शरद पवार गटाने याआधीच निवडणूक आयोगाला पाठवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com