MNS News
MNS NewsSaam Tv

MNS News: मनसैनिकांची मुंबई-गोवा महामार्गावर तोडफोड, सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर...

Mumbai Goa Highway News: मनसैनिकांची मुंबई-गोवा महामार्गावर तोडफोड, सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर...
Published on

Mumbai Goa Highway News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिक आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाची मनसे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड यांनी तोडफोड केली आहे.

मांगावमधील चेतक सन्नी कंपनीचं कार्यलय त्यांनी फोडलं आहे. तत्पूर्वी काही वेळापूर्वीच राज ठाकरे यांचा मेळावा झाला होता.

MNS News
Beed News: धनंजय मुंडे यांच्या होम पीचवर शरद पवारांची सभा, बीडमध्ये राजकारण तापलं...

या मेळाव्यात त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलन करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. यानंतर लगेचच त्याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, आज पनवेल येथे राज ठाकरे यांच्या सभा पार पडली. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मला कळत नाही ते चांद्रयान चंद्रावर का पाठवलं आहे. चांद्रयानाचा आपल्याला काय उपयोग आहे. तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत तर ते यान महाराष्ट्रात सोडायचं ना.

MNS News
Mumbai Crime News: सायन रेल्वे स्थानकावर जोडप्याची तरूणाला मारहाण, रुळावर पडताच लोकलने उडवलं; नेमकं काय घडलं?

राज्यातील लोकांचं मला कौतुक वाटतं. २००७-०८ साली मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरु झालं. आतापर्यंत येथे १५ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. पण रस्ता आहे तसाच आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com