BJP on Patna Opposition meeting Saam TV
मुंबई/पुणे

Opposition Meeting in Patna : मोदींना देशाची तर विरोधकांना स्वतःच्या मुलाबाळांची चिंता, चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी भाजपविरोधात एकजूट केली आहे. याच निमित्ताने आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, जेडीयू, राजद आणि आपसह अनेक पक्षांच्या नेत्यांची पाटणा येथे बैठक होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.

या बैठकीसाठी राज्यातून शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे रवाना झाले आहे. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवार आणि ठाकरेंसह विरोधकांवरु सडकून टीका केली आहे. (Latest Marathi News)

विरोधक स्वतःच हित जपण्यासाठी एकत्र

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत जाऊन देशाची मान उंचावत आहेत. तर दुसरीकडे मोदींच्या विरोधात गळा काढण्यासाठी विरोधक आज पाटण्यात एकत्र येत आहेत. मोदींना देशहिताची चिंता आहे तर विरोधक स्वतःच हित जपण्यासाठी एकत्र आले आहेत, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे.

पोराबाळांच्या भविष्यासाठी विरोधक एकवटले

एकत्र आलेल्या विरोधकांना जनतेची नाही तर आपल्या मुलांची चिंता आहे. सोनिया गांधी राहुल गांधींना पंतप्रधान करु इच्छितात, शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांची चिंता आहे. उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंचं भविष्य दिसतंय. त्यामुळे आपल्या पोराबाळांच्या भविष्यासाठी विरोधक एकवटले आहेत, असा टोला बावनकुळे यांनी लगावला. (Latest News)

जनता मोदीजींनाच साथ देणार

देशातील जनता या विरोधकांचा डाव ओळखून आहे. २०१९ सालीही जनतेनं मोदीजींवर विश्वास टाकत फक्त आपल्या कुटुंबाचं हित बघणाऱ्या विरोधकांना घरी बसवलं होतं. आता २०२४ मध्येही जनता मोदीजींची साथ देणार आहे, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT