Palghar saam tv
मुंबई/पुणे

Political News : भाजप जिल्हाध्यक्षांच्या नाराजीतून पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश

या प्रवेशामुळे बहुजन विकास आघाडीची ताकत वाढल्याची चर्चा सुरु आहे.

रुपेश पाटील

Palghar News : पालघर जिल्ह्यातील भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या कारभाराला कंटाळून अनेक कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला. बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील (bahujan vikas aghadi mla rajesh patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केल्याने बहुजन विकास आघाडीची ताकत जिल्ह्यात वाढली आहे. (Maharashtra News)

पालघर भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष भरत राजपूत आदिवासी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची गळीचेपी करत असल्याचा आरोप करत डहाणू विधानसभेतील भाजप जिल्हा उपाध्यक्षसह डहाणूतील अनेक सरपंच (sarpanch) आणि उपसरपंच यांनी बहुजन विकास आघाडीत जाहीर प्रवेश केला.

भाजपने जिल्हाध्यक्ष पदाची माळ भरत राजपूत यांच्या गळ्यात टाकल्यानंतर भरत राजपूत यांच्याकडून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि डहाणू विधानसभेतील सरपंच, उपसरपंच यांची गळचेपी सुरू केल्याचा आरोप यावेळी बहुजन विकास आघाडीत प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. बहुजन विकास आघाडीत झालेल्या या जोरदार इन्कमिंगमुळे भाजपला डहाणू विधानसभेत मोठी खिंडार पडली आहे. तसंच बहुजन विकास आघाडीत सर्व कार्यकर्त्यांना योग्य न्याय दिला जाईल असे आश्वासन यावेळी आमदार राजेश पाटील यांनी प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना दिल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

बाबोsss ! २० हजाराला कोथिंबीर जुडी, ४१ हजाराला एक नारळ, पाहा VIDEO

Gautami Patil New Song: सबसे कातील गौतमी पाटीलचं “राणी एक नंबर” गाणं प्रदर्शित

SCROLL FOR NEXT