Neelam Gorhe On Nitesh Rane : नितेश राणेंच्या 'त्या' आरोपावर निलम गोऱ्हेंचे चोख प्रत्युत्तर

मी निलमताईंची नव्हे तर उद्धव ठाकरेंची चाैकशी करा असे म्हणत असल्याचे आज (बुधवार) नितेश राणेंनी स्पष्ट केले.
neelam gorhe, nitesh rane
neelam gorhe, nitesh ranesaam tv

Pandharpur News : जो खटला कोर्टाने रद्द केला आहे त्यावर कोणी भाष्य करत असेल तर त्याबद्दल मला बोलायचे नाही असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (neelam gorhe latest marathi news) यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपावर स्पष्ट केले. साम टीव्हीशी बाेलताना गाे-हे यांनी त्यांचे काय ज्ञान आहे असाही प्रश्न उपस्थित केला. (Maharashtra News)

neelam gorhe, nitesh rane
Onion Price Hike : दसरा-दिवाळीच्या तोंडावर कांदा खाऊ लागला भाव, सरासरी ४०० रुपयांची मिळू लागली वाढ

पुण्यातील दंगल घडविण्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा (uddhav thackeray) हात असल्याचा आराेप मंगळवारी आमदार नितेश राणे (mla nitesh rane latest marathi news) यांनी केला हाेता. हा आराेप करताना राणेंनी माजी पाेलीस आयुक्त मीरा बाेरवणकर (Meera Borwankar) यांच्या पत्रकार परिषदेतील मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोरे यांच्या विराेधातील दंगलीबाबतचे पूरावे हाेते याचा दाखला दिला हाेता.

निलम गोऱ्हे या आज (बुधवार) पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी साम टीव्हीशी संवाद साधताना गाे-हेंनी जो खटला कोर्टाने रद्द केला आहे. त्यावर कोणी भाष्य करत असेल तर त्याबद्दल मला बोलायचे नाही. त्या व्यक्तीचे काय साधारण ज्ञान आहे. ते काय कायद्याचे अभ्यासक आहेत का ? असे म्हणत राणे यांच्या आरोपाकडे त्यांनी दुर्लक्ष केले.

neelam gorhe, nitesh rane
Bar Council Of India : वकील रणजीतसिंह घाटगे याची सनद रद्द, १४ लाख दंड देण्याचाही हुकूम; जाणून घ्या पक्षकाराची तक्रार

इच्छुक महिला मुख्यमंत्र्यांना टाेला

ज्या लोकांना आपल्या पक्षात स्थान नाही असे लोक महिला मुख्यमंत्री होण्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत. अशी शंका वाटत आहे त्यांनी स्वतःचा कामाच्या आधारे स्थान मिळावे. असा टोला इच्छुक महिला मुख्यमंत्र्यांना लगावला. पण सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून चांगले काम सुरू असल्याचे ही गोऱ्हे यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

neelam gorhe, nitesh rane
PM To Visit Shirdi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिर्डीतील विकासकामांचे लोकार्पण होणार : खासदार सुजय विखे-पाटील

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com