BJP News  Saam tv
मुंबई/पुणे

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

bjp latest news : भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. मराठमोळ्या अभिनेत्रीच्या उमेदवारीवरून स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

Vishal Gangurde

अभिनेत्रीच्या उमेवदारीवरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीनाट्य

बाहेरील उमेदवाराला संधी भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

बाहेरील उमेदवाराला संधी दिल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतील मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक २५ मध्ये भाजपने दिलेल्या उमेदवारीमुळे पक्षांतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे. स्थानिक आणि युवा चेहऱ्यांना डावलून बाहेरील उमेदवाराला संधी दिल्याने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

भाजपकडून वॉर्ड क्रमांक २५ साठी अभिनेत्री निशा परुळेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र हा वॉर्ड खुला असतानाही स्थानिक व तरुण उमेदवारांना संधी न देता बाहेरील उमेदवार दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. निशा परुळेकर या स्थानिक नसल्याने त्या स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा व प्रश्न समजून घेऊ शकणार नाहीत, अशी भावना भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आहे.

या वॉर्डमधून भाजपचे देवांग दवे आणि शिवसेना शिंदे गटाचे शेखर शेरे उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र दोघांनाही डावलल्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी आहे. देवांग दवे यांनी सोशल मीडियावरून थेट पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त करत, बाहेरील उमेदवार स्थानिक जनतेच्या अपेक्षांचे प्रतिनिधित्व करत नसल्याचा आरोप केला आहे.

याच नाराजीचा परिणाम म्हणून काही स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारापासून दूर राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या घडामोडींमुळे वॉर्ड क्रमांक २५ मध्ये भाजपची अडचण वाढण्याची शक्यता आहे. आता या अंतर्गत वादाचा थेट परिणाम निवडणूक निकालावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं! १० तोळ्यामागे २४,५०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Ind Vs Nz: बॅट लोखंडाची नाहीये ना? तुफान खेळीनंतर किवींनी तपासणी अभिषेक शर्माची बॅट

Maharashtra Live News Update: कर्तव्यपथावर शौर्यदर्शन! ३० चित्ररथांचं संचालन सुरु

O Romeo : शाहिद कपूर झाला मालामाल; 'ओ रोमियो'साठी घेतलं तगडे मानधन, नाना पाटेकरांची फी किती?

Post Office Recruitment: भारतीय डाक विभागात सर्वात मोठी भरती; २८,७४० पदे भरली जाणार; पात्रता फक्त १०वी पास

SCROLL FOR NEXT