Maharashtra political News  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; चव्हाणांकडून बालेकिल्ल्याला खिंडार, VIDEO

Maharashtra political News : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी शिंदेसेनेला पुन्हा एकदा जोरदार धक्का दिलाय...मात्र याचं धक्कातंत्रानंतर महायुतीत फोडाफोडीच्या राजकारणावरून वादाची ठिणगी पडलीय? कल्याण- डोंबिवली नेमकं काय घडलं? महायुतीत फाटाफूट का होतेय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टंनंतर...

Suprim Maskar

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण - डोंबिवलीत सुरु असलेलं फोडाफोडीचं राजकारण काही थांबण्याचं चिन्ह नाही... अशातच कल्याण ग्रामीणमधील शिंदेसेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसले आणि सदानंद थरवळांचा मुलगा अभिजीत थरवळ यांच्या हाती भाजपनं कमळ देऊन शिंदेंना पुन्हा धक्का दिलाय. भाजपच्या या फोडीफोडीवर शिंदेसेना आता आक्रमक झालीय...

एकीकडे डोबिंवलीत भाजपनं केलेल्या फोडाफोडीमुळे शिंदे आधीच नाराज असतांना आता कल्याण मधील शिवसैनिकांना भाजपनं गळाला लावल्यानं महायुतीतील तणावही वाढलाय.. रवींद्र चव्हाण त्यांच्या मनाप्रमाणे वागत आहेत. मग अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन होणारच... असं म्हणत शिरसाटांनी थेट चव्हाणांना स्वबळाचा इशारा दिलाय..

महायुतीत झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता... तर दिल्लीतही सर्वपक्षीय बैठकीला श्रीकांत शिंदेंनी गैरहजर राहून आपली नाराजी अप्रत्यक्षरित्या दाखवून दिली.

तरीही बालेकिल्ल्यातच शिंदेंची कोंडी करुन राज्यभरात शिंदेगटाचं टेन्शन भाजपनं वाढवलंय. त्यामुळे आता महापालिका निवडणूकीत शिंदे स्वबळाच्या जोरावर भाजपला रोखणार की स्वबळाचा इशारा केवळ कार्यकर्त्यांना उर्जा देण्यासाठी आहे हे लवकरच कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आयआयटीमध्ये पीएचडी विद्यार्थ्याची आत्महत्या, सहाव्या मजल्यावरून उडी मारली, कॅम्पसमध्ये शोककळा

Maharashtra Live News Update: लासलगावमध्ये अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; ३ किलोहून अधिक एमडी पावडर जप्त

Gold Rate Today: सोन्यामध्ये आतापर्यंत सर्वात मोठी वाढ, प्रति तोळा ₹५०२० रूपयांनी महागलं, पाहा २२k, २४k चे आजचे दर

Puff Sleeves Blouse Designs: फुग्याच्या हातांचा नवीन ट्रेंड, हे आहेत पफ स्लीव्हचे ब्लाऊजचे 5 ट्रेडिंग पॅटर्न

Shocking : लातूर हादरलं! नवऱ्याचा राग लेकीवर, संतापलेल्या आईने दीड वर्षाच्या मुलीवर चाकूने केले वार, जागेवर मृत्यू

SCROLL FOR NEXT