महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेची मोठी घोषणा; १३ प्रमुख स्टेशनवर महत्वाचा निर्णय लागू, जाणून घ्या सविस्तर

central railway : महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय घेण्यात आलाय. १३ प्रमुख स्टेशनवर महत्वाचा निर्णय लागू करण्यात आला आहे.
central railway news
central railway Saam tv
Published On
Summary

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेने १३ प्रमुख स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर ५ ते ७ डिसेंबरदरम्यान गर्दी नियंत्रणासाठी हा निर्णय

वरिष्ठ नागरिक, बालक, आजारी आणि महिला प्रवाशांसाठी अपवाद

महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेने ५ डिसेंबर ते ०७ डिसेंबर या कालावधीत १३ प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी अपेक्षित असल्याने मध्य रेल्वेने १३ प्रमुख स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेने या उपाययोजनेचा उद्देश प्लॅटफॉर्मवरील गर्दी नियंत्रणात ठेवणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची हालचाल सुरळीत व्हावी, असे जाहीर केले आहे. प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवरील निर्बंध असलेल्या स्थानकांची नावे रेल्वेने जाहीर केली आहे.

central railway news
Sakal Media Group Survey : वार्षिक परीक्षेत महायुती सरकार उत्तीर्ण; कायदा व सुव्यवस्थेच्या पेपरला किती गुण मिळाले?

मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर स्थानकांवर ५ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान निर्बंध लागू राहतील. भुसावळ विभागातील भुसावळ, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, अकोला, शेगाव, पाचोरा, बडनेरा, मलकापूर आणि चाळीसगाव या स्थानकांवर ५ डिसेंबर आणि ६ डिसेंबर रोजी निर्बंध लागू राहतील. नागपूर विभागातील नागपूर स्थानकावर ५ डिसेंबर आणि ६ डिसेंबर रोजी निर्बंध लागू राहतील.

central railway news
जीवाशी खेळ! पुण्यात बनावट गुटख्याचा कारखाना; पोलिसांकडून कारवाईत १ कोटींचा मुद्देमाल जप्त

अपवाद कोणाला असेल?

वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, बालक, निरक्षर प्रवासी तसेच एकट्याने प्रवास करू न शकणाऱ्या महिला प्रवासी यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींना प्रवास सुलभ राहावा म्हणून या निर्बंधांमधून वगळण्यात आले आहे. प्रवाशांनी प्रवासाची योग्य प्रकारे आखणी करून या नवीन नियमांचे पालन करावे, ज्यामुळे प्रवास सुरळीत व सुरक्षित होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com