सचिन जाधव, साम टीव्ही
पुण्यातील विविध राजकीय पक्षांच्या युवक संघटनांच्या प्रतिनिधींची आज वैशाली येथे अनौपचारिक नाश्ता भेट पार पडली. गेल्या काही महिन्यांत युवक संघटनांमध्ये निर्माण झालेले मतभेद, वाद आणि वाढती आक्रमकता यावर सकारात्मक व मोकळा संवाद व्हावा, हा या भेटीमागचा मुख्य उद्देश होता. प्रत्येकाची राजकीय विचारधारा आणि भूमिका वेगळी आहे आणि त्या आपापल्या जागी कायम राहतील. मात्र, वैचारिक मतभेद हे वैयक्तिक द्वेष, कटुता किंवा संघर्षाचे कारण बनू नयेत, यावर उपस्थित युवक प्रतिनिधींनी सकारात्मक चर्चा केली.
लोकशाहीमध्ये मतभेद आणि राजकीय स्पर्धा स्वाभाविक आहेत; मात्र ही स्पर्धा विचारांची असावी, व्यक्तींची नाही, असा संदेश यावेळी देण्यात आला. पुण्यातील युवक राजकारणात संवाद, परस्पर आदर आणि सकारात्मक राजकीय वातावरण निर्माण करण्यासाठी अशा संवादांना पुढेही प्रोत्साहन देण्याचा सूर उपस्थितांनी व्यक्त केला.
या भेटीस युवक काँग्रेसचे अक्षय जैन, सौरभ आमराळे, भुषण रानभरे; भारतीय जनता युवा मोर्चाच्या निवेदिता एकबोटे, दुष्यंत मोहोळ; युवासेनेचे किरण साळी; मनसेचे धनंजय दळवी; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युवतीच्या मनाली भिलारे; युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे राम थरकुडे, परेश खांडके; राष्ट्रवादी काँग्रेसच्या लावण्या शिंदे; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युवकचे किशोर कांबळे, अजिंक्य पालकर तसेच वंदे मातरमचे लेशपाल जवळगे आदी उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.