Maharashtra News Live Update : संगमेश्वरच्या गजबजलेल्या बाजारपेठेत बिबट्याचा वावर

Marathi Breaking Live Headlines Updates :शेतकरी मोर्चा, ज्ञानेश कुमार, महाराष्ट्र दुष्काळ, चक्रीवादळाचे अपडेट, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

Nashik : नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

* नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

* तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती मिळवण्यासाठी याचिकाकर्त्यांचे प्रयत्न

* साधुग्राम उभारण्यासाठी पर्यायी जागा अद्याप उपलब्ध नसल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा

* साधू-संत मात्र त्याच जागेवर साधुग्राम उभारण्यावर ठाम

* प्रशासनाच्या तोंडी आश्वासनांवर विश्वास नसल्याची याचिकाकर्त्यांची भूमिका

Sangmeshwar : संगमेश्वरच्या गजबजलेल्या बाजारपेठेत बिबट्याचा वावर

रत्नागिरी जिल्ह्यात आता बिबट्या थेट मानवी वस्तीतच नव्हे, तर बाजारपेठांमध्येही शिरू लागला आहे.

संगमेश्वरच्या आठवडा बाजारपेठ परिसरात बिबट्याचा वारंवार वावर दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेत मोगलाई सुरू

नवी मुंबई महानगरपालिकेत मोगलाई सुरू

विना पुरावा अधिकार्यांवर निलंबनाचे बालट

शिवसेनेचा सत्ताधारी भाजपावर आरोप

Navi Mumbai : दात घासता घासता टूथब्रशच गिळला; शस्त्रक्रियेविना डॉक्टरांनी पोटातून काढला बाहेर!

पेणमधील ५० वर्षीय रिक्षाचालकावर नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

३० मिनिटांच्या आव्हानात्मक एंडोस्कोपी प्रक्रियेद्वारे टूथब्रश बाहेर काढण्यात यश

Yavatmal : देशी कट्ट्याची खरेदी विक्री प्रकरणी तिघे जेरबंद

यवतमाळ शहरात देशी बनावटीची पेस्टल विक्रीसाठी आणली असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली

त्यावरून पथकाने चौसाळा मार्गावर सापळा रचून तिघांना रात्री रंग यात अटक केली

त्यांच्याकडून दोन वाहना सह दोन लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

Nanded : दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर नांदेड जिल्ह्यात थंडीची चाहूल

दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर नांदेड जिल्ह्यात थंडीची चाहूल.

थंडीची चाहूल लागताच ग्रामीण भागात पसरली धूक्याची चादर.

नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील येळी,महाटी परिसरात धूक्याची चादर.

सर्वत्र धूक्याची चादर पसरल्याने दृश्यमानता कमी.

Thane Accident : ठाण्यातील पातलीपाडा ब्रिजजवळ भीषण अपघात

ठाण्यातील पातलीपाडा ब्रिजजवळ पहाटेच्या सुमारास पिकअप टेम्पो डिव्हायडरला धडकून आणि मागून येणारा केमिकल टँकर पलटी होऊन भीषण अपघात घडला.

या दुर्घटनेत टेम्पो चालक सलीम जखमी झाले असून, त्यांना एका जवळ असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.