Political News : 'गुंगी गुडीया'चा वाद राष्ट्रवादी रस्त्यावर, काँग्रेस नेत्यांच्या गाड्या फोडण्याचा इशारा

Maharashtra Political News : सुनेत्रा पवार यांच्यावरील 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलन छेडले आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी काँग्रेस नेत्यांना इशारा दिला असून ठाकरेसेना, अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.
SUNETRA PAWAR GUNGI GUDIYA CONTROVERSY: NCP PROTESTS AGAINST CONGRESS, SUNIL SHELKE ISSUES WARNING
SUNETRA PAWAR GUNGI GUDIYA CONTROVERSY: NCP PROTESTS AGAINST CONGRESS, SUNIL SHELKE ISSUES WARNINGSaam Tv
Published On
Summary
  • हर्षवर्धन सपकाळ यांच्या 'गुंगी गुडिया' वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

  • राज्यभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत काँग्रेसविरोधात तीव्र निषेध नोंदवला

  • आमदार सुनील शेळके यांच्या काँग्रेस नेत्यांना दिलेल्या इशाऱ्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर गुंगी गुडिया अशी टीका केल्यामुळे राष्ट्रवादी सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसविरोधात रस्त्यावर उतरलीय. एवढंच नव्हे तर काँग्रेस नेत्यांच्या गाड्या फोडण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या आमदारानं दिलाय. कोण आहे हा आमदार? ठाकरेसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीनं यावर काय भूमिका घेतलीय जाणून घ्या.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा 'गुंगी गुडीया' असा उल्लेख केल्यानं सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीनं राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं केली. त्यामुळे राजकीय वातावरण तापलंय. नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयापासून काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. हा मोर्चा पोलिसांनी रस्त्यातच अडवला. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले.तर नागपुरातही व्हेरायटी चौकात कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

SUNETRA PAWAR GUNGI GUDIYA CONTROVERSY: NCP PROTESTS AGAINST CONGRESS, SUNIL SHELKE ISSUES WARNING
Egg Benefits : पिवळा की पांढरा? अंडे खाताना कोणता भाग खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरेल

जालन्यात हर्षवर्धन सपकाळांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त केलाय. तर मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी काँग्रेस नेत्यांच्या गाड्या फोडण्याचा इशारा दिलाय. दरम्यान गुंगी गुडीया टिकेवरुन ठाकरे सेनेने काँग्रेसचे समर्थन केलंय. तर वहिनी प्रशासनात प्रभावीपणे काम करतायत, असं प्रत्युत्तर तटकरेंनी दिलंय. शरद पवारांच्या पक्षाने मात्र सावध प्रतिक्रिया दिलीय.

पवार कुटुंबाचं मुळ गाव काटेवाडीतही महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा निषेध केलाय. सुनेत्रा वहिनी कमी बोलतात आणि कृतीतून काम दाखवतात. त्यांचं काम पाहायचे असेल तर काटेवाडीत या, असं आव्हान दिलंय. पक्षाचे कार्यकर्ते तर आक्रमक झालेत. भविष्यात सुनेत्रा पवारही तशाच आक्रमक होऊन स्वपक्षातील आमदारांवर वचक ठेवणार आणि विरोधकांनाही जशास तसं प्रत्युत्तर देणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com