

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवीन वर्षात फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर नवे वेळापत्रक तुम्ही जाणून घेतलं पाहिजेत. राज्य सरकारने सार्वजनिक सुट्ट्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षभरात १८ सार्वजनिक सुट्ट्या मिळणार असून, याशिवाय २३ ऐच्छिक सुट्ट्यांची सुविधाही मिळणार आहे. पण यंदा आठ सार्वजनिक सुट्ट्या शनिवार आणि रविवारी येत असेल तर कर्मचाऱ्यांच्या पदरी काहीशी निराशी पडू शकते.
राज्य सरकारने २०२७ या वर्षासाठी एकूण १८ सार्वजनिक सुट्ट्या अधिसूचित केल्या आहेत. यामध्ये प्रजासत्ताक दिन, रमजान ईद, होळी, गुड फ्रायजे, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, कामगार दिन, बकरी ईद, स्वातंत्र्यदिन, गणेश चतुर्थी, गांधी जयंती, दसरा, दिवाळी, सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त, गोवा मुक्तिदिन आणि नाताळ या सणांचा समावेश आहे.
मात्र, या १८ सार्वजनिक सुट्ट्यांपैकी आठ सुट्ट्या शनिवार किंवा रविवारी येत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सु्ट्टीचा फायदा मिळणार नाही. उर्वरित १० सुट्ट्या सोमवार ते शुक्रवार या कामकाजाच्या दिवशी असणार आहेत. रमजान ईद आणि बकरी ईदच्या सुट्ट्या चंद्रदर्शनावर अवलंबून असतील.
सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त सरकारने महाशिवरात्री आणि मिलाद-उन-नबी या दोन विशेष सुट्ट्याही जाहीर केल्यात. मात्र, या दोन्ही सु्ट्ट्या शनिवार आणि रविवार या दिवशी येतात. त्यामुळे या सुट्ट्यांच्या बदल्यात इतर दिवशी सुट्टी देण्याची मागणी करता येणार नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.
सरकारने २३ ऐच्छिक सुट्ट्यांची यादीही जाहीर केली आहे. याशिवाय व्यावसायिक आणि औद्योगिक आस्थापनांसाठी नऊ सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत. बँकांसाठी स्वतंत्रपणे १८ सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सरकारी कार्यालये, खासगी आस्थापना, औद्योगिक क्षेत्र आणि बँकांसाठी सुट्ट्यांचे वेळापत्रक वेगवेगळे असणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयाला लागू असलेली अधिकृत सुट्टीची यादी तपासून नवीन वर्षाचे नियोजन करणं महत्त्वाचं ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.