बीएमसी निवडणुकीसाठी भाजपने एबी फॉर्म वाटप सुरू केले
७० ते ८० उमेदवारांना उमेदवारी अर्ज देण्यात आले
मुख्यमंत्र्यांचे विश्वासू नवनाथ बन निवडणुकीच्या रिंगणात
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता
आज भाजपची पहिली यादी जाहीर होईल
मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून ७० ते ८० जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे राजकीय हालचलींना वेग आला आहे. भाजपने एबी फॉर्मचे वाटप करण्यास सुरूवात केली असून पहाटेपर्यंत अनेक उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांची नावं साम टीव्हीच्या हाती लागली आहेत.
भाजपकडून उमेदवारांना एबी फॉर्म दिले जात आहे. पहाटेपर्यंत अनेक उमेदवारांना भाजपने उमेदवारी अर्ज दिले. भाजपने यावेळी अनेक अनुभवी माजी नगरसेवकांसोबत युवा नेत्यांवर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी अर्ज दिले आहेत. महत्वाचे म्हणजे आमदार-खासदारांच्या मुलांना आणि नातेवाईकांना तिकीट देणं भाजपने थांबवलं असून त्यांच्यांबाबत निर्णय थोड्याच वेळात घेण्यात येणार आहे. भाजपने ज्यांना एबी फॉर्म दिला आहे त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे विश्वासू नवनाथ बन निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पालिका निवडणुकीमध्ये भाजपने नवीन युवा चेहऱ्यांना संधी दिली असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई महानगर पालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबईमध्ये भाजप १२८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीमध्ये आपले सर्वात जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी भाजपने कसलीही कसर सोडली नाही. भाजपने आतापर्यंत ज्या उमेदवारांना एबी फॉर्म दिला आहे ते सर्वजण आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. भाजपकडून थोड्याच वेळात अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.
तेजिंदर तिवाना
नवनाथ बन
सनी तानप राठी
जितेंद्र पटेल
शिवानंद शेट्टी
तेजस्वी घोसाळकर
श्वेता कोरगावकर
शिल्पा सांगुरे
गणेश खणकर
राजश्री शिरोडकर
आकाश पुरोहित
बाळा तावडे
विनोद मिश्रा
अक्षता नार्वेकर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.