BMC Election : मुंबईत प्रकाश आंबेडकरांमुळे काँग्रेसचं बळ वाढलं; 'वंचित'चे उमेदवार कोणत्या वॉर्डातून निवडणूक लढणार?

BMC Election update : मुंबईत प्रकाश आंबेडकरांमुळे काँग्रेसचं बळ वाढल्याचं बोललं जात आहे. दोन्ही पक्षांनी मुंबईत युतीची अधिकृत घोषणा केली आहे.
vba and congress
bmc election Saam tv
Published On
Summary

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठी उलथापालथ

काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युतीची घोषणा

नव्या युतीमुळे राजकीय समीकरण बदलणार

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. मुंबई महापालिकेसाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षाने आज रविवारी युतीची अधिकृत घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या युतीवर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. यावेळी दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते या वेळी उपस्थित होते. या निर्णयामुळे मुंबईच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दोन्ही पक्षाच्या युतीअंतर्गत जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्य एकूण जागांपैकी ६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी उमेदवार उभे करणार आहे. यामुळे उर्वरित जागांवर काँग्रेस आणि युतीतील इतर घटक पक्ष निवडणूक लढवतील. मुंबई महापालिकेत काँग्रेस १५६ जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर उर्वरित जागांवर ९ जागांवर शरद पवार गट लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

VBA
vanchit bahujan aghadiSaam tv

काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आल्यामुळे मुंबई महापालिकेत इतर राजकीय पक्षांसमोर मोठं आव्हान उभे राहणार असल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांनी आगामी निवडणुकीसाठी संयुक्त रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. युतीची घोषणा झाल्यानंतर आता युतीतील पक्ष मुंबईभर संयुक्त प्रचार दौरे, कोपरा सभा आणि जनसंवाद कार्यक्रमाचे नियोजन केले जात आहे.

vba and congress
पुण्यातील उच्चशिक्षित जोडपं लव्ह मॅरेजनंतर २४ तासांच्या आत झालं वेगळं; कारण फक्त एवढंच

मुंबईच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी ही युती करण्यात आल्याचे नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या निवडणुकीत ही आघाडी निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

vba and congress
सामना सुरू होण्याआधीच क्रिकेट कोचचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; क्रीडाविश्वावर शोककळा

चंद्रपुरात शिवसेना-वंचित युती जाहीर

चंद्रपुरात महानगरपालिकेसाठी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती जाहीर झाली आहे. आज एका संयुक्त पत्रकार परिषदेच्या माध्यमातून युतीची घोषणा करण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे आणि वंचितचे जिल्हाध्यक्ष स्नेहल रामटेके यांनी ही युती जाहीर केली. स्थानिक पातळीवर युती करण्याचे स्वातंत्र्य पक्षांनी दिल्याने हा निर्णय घेतल्याचे या दोन्ही जिल्हाध्यक्षांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com