Bikaner Samosa Viral Video Saam tv
मुंबई/पुणे

Bikaner Samosa Viral Video : बिकानेरच्या सामोशात आढळला मेलेला झुरळ; बेलापूर सीबीडीमधील धक्कादायक प्रकार

Belapur CBD Bikaner Samosa Viral Video : नवी मुंबईच्या बेलापूर सीबीडीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेलापूर सीबीडीमधील एका खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानातील सामोशात मेलेला झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Vishal Gangurde

Bikaner Samosa Viral Video News :

नवी मुंबईच्या बेलापूर सीबीडीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेलापूर सीबीडीमधील एका खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानातील सामोशात मेलेला झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका पत्रकार तरुणीने हा प्रकार उघडकीस आणला. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील बेलापूर सीबीडी परिसरात जागोजागी सामोसे, वडापाव सारखे खाद्यपदार्थांचं गाडे आहेत. बेलापुरातील प्रत्येक चौकावर फास्टफूडचे गाडे पाहायला मिळतात.

या गाड्यावर मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्गाची गर्दी पाहायला मिळते. तर काही दुकानातही खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. याच प्रकारे फास्टफूड, खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या बिकारनेर दुकानातील सामोशात मेलेला झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्रकार प्रिया मोरे हिने हा धक्कादायक प्रकार समोर आणला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमकं काय घडलं?

पत्रकार प्रिया मोरेने शुक्रवारी सकाळी बिकानेरच्या दुकानातून सामोसे मागवले होते. प्रियाने बिकानेर मागविलेले सामोसे खाण्यास सुरुवात करत असतानाच, त्यात मेलेला झुरुळ आढळला.

सामोशात मेलेला झुरळ आढळल्यानंतर बिकानेर दुकानात जाऊन तिने संताप व्यक्त केला. सामोशात मेलेला झुरळ असल्याचे मान्य करत बिकानेर दुकानदाराने जाऊद्या, सोडून द्या, म्हणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रियाने या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ करुन लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला.

या धक्कादायक प्रकाराबद्दल प्रिया मोरे काय म्हणाली?

या व्हिडिओमध्ये प्रिया मोरेने म्हटलं की, 'बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या बिकानेर दुकानातून सामोसा मागवला होता. या सामोशात झुरळ आढळलं. मी सामोसा खायला घेतला, तेव्हा कळालं की यात झुरळ आहे. हा प्रकार पाहून मला आणि ऑफिसमधील सर्व सहकाऱ्यांना धक्का बसला. मी सामोसा घेऊन या दुकानात आले'.

'बिकानेर दुकानदाराला देखील ही बाब सांगितली. ते म्हणाले आमच्याकडून चूक झाली. त्यांनी हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांच्या आरोग्याशी खेळ होत असेल तर हे अत्यंत वाईट आहे. माझ्या ऑफिसमधील इतर कर्मचारी येथून सामोसे विकत घेतात. पहिल्यांदा हा प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे लोकांचे डोळे उघड्यासाठी दुकानात आले,असे तिने पुढे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vishalgad Fort History: सह्याद्रीतील प्राचीन गड, जाणून घ्या विशालगड किल्ल्याची वास्तुकला आणि इतिहास

Tuesday Horoscope : हितशत्रूंचा धोका अन् अतिधनाचा मोह आवरा; ५ राशींच्या लोकांना घ्यावी लागेल विशेष काळजी

GK: Gen Z आहेत कोण? नेपाळच्या रस्त्यावर तरुणांनी घातला मोठा गोंधळ

Maharashtra Live News Update: हिंजवडीतील खराब रस्त्याविषयी सुप्रिया सुळे यांची परत एकदा एक्स वर पोस्ट करत प्रशासनाची कानउघडणी

Pitru Paksha 2025: पितृपक्षात कपडे विकत घेणे का टाळावे? जाणून घ्या नेमकं कारण

SCROLL FOR NEXT