Shivsena Mahesh Gaikwad Health Update  Saam TV
मुंबई/पुणे

Mahesh Gaikwad News: महेश गायकवाड यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Satish Daud

Shivsena Mahesh Gaikwad Health Update

उल्हासनगर शहरात सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राडा झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ५ गोळ्या झाडल्या. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस ठाण्यातच हा प्रकार घडला. या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, डॉक्टरांनी महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. गोळीबारानंतर पोलिसांनी महेश गायकवाड यांना उपचारासाठी उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. (Latest Marathi News)

मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आता महेश गायकवाड यांच्या प्रकृतीसंदर्भात कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

महेश यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सर्व गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. तसेच राहुल पाटील यांच्या शरीरातूनही दोन गोळ्या डॉक्टरांनी बाहेर काढल्या आहे, असं गोपाळ लांडगे यांनी सांगितलं.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते. सध्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील दोघांची प्रकृती स्थिर आहे. चिंता करण्याचे कुठलेही कारण नाही, अशी माहिती देखील गोपाळ लांडगे यांनी दिली.

दरम्यान, महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबारानंतर पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना अटक करण्यात आली असून इतर तिघांचा शोध सुरू आहे. शुक्रवारी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT