Ambernath Politics Saam Tv
मुंबई/पुणे

Ambernath Politics: मोठी बातमी! अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Big setback for Congress in Ambernath: अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. निलंबनाची कारवाई केलेल्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नवी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Priya More

Summary -

  • अंबरनाथमध्ये मोठा राजकीय भूकंप

  • काँग्रेसचे १२ नगरसेवक भाजपमध्ये दाखल

  • काँग्रेस पक्षाला स्थानिक पातळीवर मोठा धक्का

  • रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीत प्रवेश

  • नगरपरिषदेत राजकीय समीकरणे बदलली

अंबरनाथमधील काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या १२ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीत या सर्वांनी भाजपचे कमळ हाती घेतले. या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. अंबरनाथ नगरपरिषदेमध्ये विजयी झाल्यानंतर काँग्रेसच्या या सर्व १२ नगरसेवकांनी भाजपसोबत युती केली होती. त्यानंतर पक्षाकडून त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

काँग्रेस पक्षाकडून निलंबनाची कारवाई केल्यानंतर या नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. या नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज नवी मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. घडलं असं की, काँग्रेसमुक्त भारतच्या घोषणा देणाऱ्या भाजपसोबत काँग्रेसने अंबरनाथ नगरपरिषदेत हातमिळवणी केली होती. या नगरपरिषदेत विजयी झालेल्या १२ नगरसेवकांनी परस्पर युती करण्याबाबतचा निर्णय घेतला होता.

काँग्रेसच्या या १२ नगरसेवकांनी घेतलेला निर्णय पक्षशिस्तीचा भंग करणारा असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली. अंबरनाथच्या प्रदीप पाटील यांच्यासह १२ नगरसेवकांचे काँग्रेसमधून निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर या नगरसेवकांनी काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक, संजीव नाईक, दीपेश म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्व नगरसेवकांनी भाजपचे कमळ हाती घेतले. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी या सर्व नगरसेवकांचे पक्षात स्वागत केले. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोणताह दगा फटका होऊ नये यासाठी काँग्रेसच्या १२ नगरसेवक अज्ञातस्थळी नेण्यात आले होते.

या १२ नगरसेवकांनी केला भाजपमध्ये प्रवेश -

१) प्रदीप नाना पाटील

२) दर्शना उमेश पाटील

३) अर्चना चरण पाटील

४) हर्षदा पंकज पाटील

५) तेजस्विनी मिलिंद पाटील

६) विपुल प्रदीप पाटील

७) मनीष म्हात्रे

८) धनलक्ष्मी जयशंकर

९) संजवणी राहुल देवडे

१०) दिनेश गायकवाड

११) किरण बद्रीनाथ राठोड

१२) कबीर नरेश गायकवाड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT