Mumbai Metro  Saamtv
मुंबई/पुणे

Mumbai Metro: गुड न्यूज! ३ एप्रिलपासून मुंबईत २ नव्या मार्गावर मेट्रो धावणार, प्रवासाचा वेळ वाचणार; कुठून कसा कराल प्रवास?

Mumbai Metro Boost Two New Lines Metro 2B and 9: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मेट्रो लाईन २ बी आणि मेट्रो ९ लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. ३ एप्रिलला या दोन्ही मार्गाचे लोकार्पण होणार आहे.

Priya More

Summary -

  • मुंबईत २ नवीन मेट्रो मार्ग ३ एप्रिलपासून सुरू

  • मेट्रो २ बी आणि मेट्रो ९ च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

  • प्रवासाचा वेळ कमी होणार आणि ट्रॅफिक कमी होणार

  • दहिसर–काशीगाव आणि डायमंड गार्डन–मंडाले टप्पे सुरू होणार

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुसाट आणि आरामदायी होणार आहे. मुंबईमध्ये मेट्रो २ बी आणि मेट्रो ९ या दोन नव्या मेट्रो मार्गिकांच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला आहे. दोन्ही मेट्रो मार्ग ३ एप्रिलपासून मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. मेट्रो २ बी अंधेरी पश्चिम ते मंडाले (मानखुर्द) आणि मेट्रो ९ दहिसर ते मिरा-भाईंदर या दोन्ही मार्गावरील पहिल्या टप्प्यातील मेट्रो एकाच दिवशी धावणार आहेत. त्यामुळे मुंबईकर कुठूनही कसाही प्रवास करू शकणार आहे. या मेट्रोंमुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.

दहिसर ते काशीगाव, डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो ३ एप्रिलपासून धावणार आहेत. दहिसर ते मिरा-भाईदर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा १ आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा १ मार्गिकचे लोकार्पण गेल्या कित्येक दिवसांपासून रखडले होते. या दोन्ही मार्गिकेतील पहिल्या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही लोकार्पण रखडल्याने दोन मार्गिकांच्या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येत नव्हता. पण आता प्रवाशांची प्रतीक्षा संपली. या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो ३ एप्रिलपासून धावणार आहे.

मेट्रो ९ मार्गातील दहिसर ते काशीगाव टप्पा १ आणि मेट्रो २ बी मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा १ मार्गिकचे काम कधीच पूर्ण झाले होते पण त्याचे लोकार्पण रखडले होते. आधी तांत्रिक अडचणी आणि त्यानंतर पालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्यामुळे लोकार्पण होऊ शकले नाही. आता ३ एप्रिल रोजी या दोन्ही मेट्रोवरील पहिला टप्प्याचे लोकार्पण होणार असून हे मार्ग प्रवाशांसाठी खुले होतील.

मेट्रो २ बीवरील डायमंड गार्डन–मंडाले हा टप्पा सुरू झाल्यास ही पूर्व उपनगरातील पहिली मेट्रो सेवा ठरणार आहे. या मेट्रोमुळे मानखुर्द परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. हा मार्ग मुंबईतील सेवेत दाखल होणारा पाचवा मेट्रो मार्ग असणार आहे. मंडाले ते डायमंड गार्डनदरम्यानचा प्रवास या मेट्रो मार्गामुळे अवघ्या काही मिनिटांत होणार आहे. तर मेट्रो ९ मार्गावरील दहिसर-काशीगाव हा टप्पा सुरू झाल्यानंतर ही मुंबईतील सहावी तर मुंबई महानगर प्रदेशातील पहिली मेट्रो सेवा ठरणार आहे. या मेट्रो मार्गामुळे दहिसर ते काशीगाव प्रवास सुसाट आणि गर्दीमुक्त होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT