Mumbai Metro: 'मेट्रो- २ बी'मुळे पूर्व-पश्चिम मुंबई जोडली जाणार, महत्वाचा टप्पा झाला पूर्ण; कधीपासून होणार सुरू?

Mumbai Metro 2B: मुंबई मेट्रो- २ बीच्या कामाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या मेट्रोमुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडले जाणार आहे. कुर्ला येथे दोन यू-गर्डर यशस्वीरित्या उभारण्यात आले आहेत.
Mumbai Metro: 'मेट्रो- २ बी'मुळे पूर्व-पश्चिम मुंबई जोडली जाणार, महत्वाचा टप्पा झाला पूर्ण; कधीपासून होणार सुरू?
Mumbai Metro Saamtv
Published On

Summary -

  • कुर्ला येथील पुलावर मेट्रो 2बीसाठी दोन यू-गर्डर यशस्वीरित्या बसवण्यात आले

  • आता मेट्रो ट्रॅक टाकण्याचे काम लवकरच सुरू होणार

  • मेट्रो 2बीमुळे पूर्व-पश्चिम मुंबई जोडली जाणार

  • बीकेसी, कुर्ला आणि चेंबूरला मोठा फायदा होणार

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा मुंबई मेट्रो लाईन २ बीचा एक महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. एमएमआरडीएने मुंबई मेट्रो २बी वरील मुंबई पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कुर्ला परिसरातील एका पुलावर दोन यू-गर्डर यशस्वीरित्या उभारण्यात आले आहेत. गर्डर बसवल्यामुळे आता मेट्रो ट्रॅक टाकण्याचे काम देखील लवकरच हाती घेतले जाणार आहे. त्यानंतर विद्युतीकरण, दूरसंचार व्यवस्था आणि इतर कामे हाती घेतली जाणार आहे.

एमएमआरडीएने कुर्ला परिसरातील हलाव पुलावर दोन यू-गर्डर यशस्वीरित्या बसवले आहेत. पूल आणि मेट्रो गर्डरमधील अंतर कमी असल्याने हे काम खूप कठीण होते. गर्डर यशस्वीरित्या बसवल्यानंतर आता यावर मेट्रो ट्रॅक टाकण्याचे काम सुरू होईल. एमएमआरडीएने डीएन नगर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, कुर्ला, चेंबूर आणि मांडला सारख्या प्रमुख क्षेत्रांना जोडण्यासाठी मेट्रो २बीची रचना केली आहे. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर बीकेसीसह कुर्ला-चेंबूर परिसरातील लाखो प्रवाशांना याचा फायदा होईल.

Mumbai Metro: 'मेट्रो- २ बी'मुळे पूर्व-पश्चिम मुंबई जोडली जाणार, महत्वाचा टप्पा झाला पूर्ण; कधीपासून होणार सुरू?
Mumbai Water Metro: मुंबईत वाहतुक कोंडीला टाटा-बायबाय, १० जलमार्गे मेट्रो धावणार, प्रस्ताव अंतिम टप्प्यात

या मेट्रोमुळे कुर्ला, चेंबूर आणि बीकेसीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल आणि त्यांचा प्रवास आरामदायी, जलद होईल. मेट्रो २बी वरील एसजी बर्वे मार्ग मेट्रो स्टेशन विमानतळाच्या मानकांनुसार विमानतळाच्या समान पातळीवर बांधले जात आहे. पुलाच्या जवळच्या कामासह स्टेशनचा पाया आणि खांबाचे काम पूर्ण झाले आहे. ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनच्या मदतीने २० मीटर लांबीचे दोन यू-गर्डर बसवण्यात आले. पूल आणि मेट्रो लाईनमध्ये फक्त ३.५ मीटर अंतर होते. या ठिकाणी दोन यू-आकाराचे गर्डर बसवणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक होते. वाहनांच्या वाहतुकीत अडथळा कमी करण्यासाठी, रात्रीच्या वेळी हे काम करण्यात आले. या कामादरम्यान अवजड वाहनांच्या मार्गात बदल करण्यात आले होते. तर हलक्या वाहनांना पुलाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली होती.

Mumbai Metro: 'मेट्रो- २ बी'मुळे पूर्व-पश्चिम मुंबई जोडली जाणार, महत्वाचा टप्पा झाला पूर्ण; कधीपासून होणार सुरू?
Mumbai Metro : मुंबईकरांचा प्रवास सुखकर! कुठे सुरू होणार नवी मेट्रो?

शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी दिली. गर्डर यशस्वीरित्या बसवल्यानंतर मेट्रो ट्रॅक टाकण्याचे काम सुरू केले जाईल असे देखील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर विद्युतीकरण, दूरसंचार व्यवस्था आणि इतर कामे केली जातील. एसजी बर्वे मार्ग मेट्रो स्टेशन या गर्डरजवळ असणार आहे. विमानतळाची उंची मर्यादा लक्षात घेऊन या ठिकाणी स्टेशन बांधण्यात आले आहे. या स्टेशनचा पाया रचण्यात आला आहे आणि ड्रॉब्रिजच्या दोन्ही बाजूंचे काम देखील पूर्ण झाले आहे.

Mumbai Metro: 'मेट्रो- २ बी'मुळे पूर्व-पश्चिम मुंबई जोडली जाणार, महत्वाचा टप्पा झाला पूर्ण; कधीपासून होणार सुरू?
Mumbai Metro : मुंबई मेट्रो ४ चे ऑडिट करण्याचे आदेश! आर-सिटी मॉलजवळील 'त्या' भेगांमुळे प्रशासन हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com