Mumbai Water Metro: मुंबईत वाहतुक कोंडीला टाटा-बायबाय, १० जलमार्गे मेट्रो धावणार, प्रस्ताव अंतिम टप्प्यात

Mumbai Underwater Metro Project: मुंबईकरांचा प्रवास आता आणखी जलद होणार आहे. मुंबईत जल मेट्रो सुरु करण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण मुंबई जोडली जाणार आहे.

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मुंबईकरांचा प्रवास जलद आणि सुखकर होणार आहे. मुंबईतील 'जल मेट्रो'चा विस्तार केला जातोय. कोची मेट्रोच्या धर्तीवर 10 नवीन जलमार्गांचा सविस्तर आराखडा अंतिम टप्प्यात आहे.लवकरच मुंबई, ठाणे, कल्याण आणि वसई-विरार जलमार्गाने जोडले जातील. सध्या 85 किमीचे 21 मार्ग सुरू असून, नवीन मार्गांमुळे हे जाळे 200 किमीपर्यंत विस्तारणारेय. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून हा पर्यावरणपूरक प्रकल्प राबवला जाणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com