Navi Mumbai to build three flyovers Saam Tv
मुंबई/पुणे

New Flyovers: ठाणे ते नवी मुंबई प्रवास होणार सुसाट, ३ नवीन उड्डाणपूल बांधणार; कसा आहे मेगाप्लान?

Navi Mumbai to build three flyovers: नवी मुंबईत ३ नवीन उड्डाणपूल तयार केले जाणार आहे. या उड्डाणपुलामुळे नवी मुंबई ते ठाणे प्रवास सुसाट होणार आहे. त्याचसोबत वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल.

Priya More

Summary -

  • ठाणे–बेलापूर मार्गावर 3 उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय

  • नवी मुंबई महापालिकेचा मेगाप्लान

  • प्रकल्पाचा एकूण खर्च अंदाजे ९०० कोटी रुपये

  • बीएसएफ ते हुंदाई शोरूमदरम्यान डबल डेकर पूल उभारण्यात येणार

ठाणे आणि नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण त्यांचा ठाणे ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते ठाणे हा प्रवास सुसाट होणार आहे. कारण ठाणे ते बेलापूरदरम्यान ३ मोठे उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगर पालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाण्यावरून नवी मुंबई असा प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. त्यांचा प्रवास सुसाट होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महापालिका प्रशासनाने ठाणे ते बेलापूर या मार्गावर ३ ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचे ठरवले आहे. त्यासाठी प्लानिंग देखील केले जात आहे. या ३ उड्डाणपूल आणि संबंधित कामांसाठी सुमारे ९०० कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे, ठाण्यातून नवी मुंबईकडे जात असताना तुर्भे परिसरातून जाणारा मार्ग सायन-पनवेल महामार्गाला जोडत असल्याने दररोज या परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठीच नवी मु्ंबई महानगर पालिकेने हे महत्वपूर्ण पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. या ठिकाणी बीएसएफ कंपनी ते हुंदाई शोरूमदरम्यान डबलडेकर पूल उभारण्यात येणार आहे.

नवी मुंबईतून ठाण्यामध्ये येत असताना आणि ठाण्यावरून नवी मुंबईत जाताना रबाळे आणि ऐरोली परिसरात संध्याकाळच्या वेळी वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वाहन चालकांना याठिकाणी एकाच ठिकाणी बराच वेळ अडकून राहावे लागते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर तर या मार्गावर वाहनांची संख्या आणखी वाढेल. त्यामुळे नवी मुंबई महानगर पालिकेकडून वाहतूक व्यवस्थेची तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

नवी मुंबईत ३ उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यामधील पहिला उड्डाणपूल क्रिस्टल हाऊस ते पावणे गाव याठिकाणी असणार आहे. या पूलासाठी ११० कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे. दुसरा पूल रबाळे जंक्शन याठिकाणी उभारण्यात येणार आहे त्यासाठी १७१ कोटींचा खर्च येणार आहे. तर तिसरा पूल बीएसएफ कंपनी ते हुंदाई शोरूम याठिकाणी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ३३८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी सांगितले की, 'नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गाचे नूतनीकरण आणि ३ उड्डाणपूल उभारण्याचा अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार काम देखील सुरू करण्यात आले आहे. नवी मुंबईत तयार होणाऱ्या या तिन्ही उड्डाणपुलासाठी ६०० कोटींचा खर्चाचे प्रकल्प एचएएम (Hybrid Annuity Model) अंतर्गत केले जाणार आहे. हे तिन्ही पूल तयार झाल्यानंतर नवी मुंबईतील प्रवास सुसाट आणि सुखकारक होईल. त्याचसोबत वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१३ नोव्हेंबरपर्यंत टोलनाका हटवा, नाहीतर उखडून टाकू; प्रताप सरनाईकांचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update: बारामतीत नगराध्यक्षपदासाठी ओबीसी चेहऱ्याला प्राधान्य द्यावे; सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची भावना

Pune Land Scam: पुणे येथील जमीन घोटाळा प्रकरणावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया|VIDEO

भयंकर! मुंबईतील प्रसिद्ध रूग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला; तिघे गंभीर जखमी, VIDEO व्हायरल

Pune Accident: कुंडेश्वर अपघाताची पुनरावृत्ती! चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला; ८ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT