New Flyover: गुड न्यूज! मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कुर्ला ते घाटकोपरपर्यंत तयार होणार उड्डाणपूल

Kulra To Ghatkopar New Flyover: मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. कुर्ला ते घाटकोपर दरम्यान उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. हा उड्डाणपूल घाटकोर-अंधेरी लिंकरोडला जोडला जाणार आहे. कसा प्लान असणार वाचा सविस्तर...
New Flyover: गुड न्यूज! मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कुर्ला ते घाटकोपरपर्यंत तयार होणार उड्डाणपूल
Kulra To Ghatkopar New FlyoverSaam Tv
Published On

Summary -

  • कुर्ला ते घाटकोपर दरम्यान नवीन उड्डाणपूल तयार केला जाणार आहे

  • हा उड्डाणपूल तयार करण्यासाठी बीएमसीकडून प्लान तयार करण्यात आलाय

  • नौदलाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रकल्पाला वेग आला

  • घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील वाहतूक कोंडी कमी होणार

मुंबईकरांसाठी गुड न्यूज आहे. लवकरच मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. कुर्ला एलबीएस रोड ते घाटकोपरपर्यंत नवीन उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे. हा उड्डाणपूल तयार करण्यासाठी योजना आखली जात आहे.

हा उड्डाणपूल तयार झाल्यावर घाटकोपर- अंधेरी लिंक रोडवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्याचसोबत मुंबईकरांचा प्रवास सुसाट आणि सोपा होईल. हा उड्डाणपूल घाटकोपर-अंधेरी लिंक रोडला जोडला जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल. या उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळही वाचेल आणि वाहतूक कोंडीही होणार नाही.

New Flyover: गुड न्यूज! मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कुर्ला ते घाटकोपरपर्यंत तयार होणार उड्डाणपूल
Sion Flyover: सायन उड्डाणपूल धोकादायक घोषित, अवजड वाहनांना बंदी; पर्यायी मार्गाचा वापर करा, BMC चे आवाहन

एलबीएस रोडवरील कल्पना सिनेमापासून घाटकोपरमधील सर्वोद्य रुग्णालयापर्यंत हा उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. या उड्डाणपुलासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या मिळवण्यात आल्या आहेत. सध्या व्हीजेटीआयकडून उड्डाणपूलाचा अभ्यास आणि सर्वेक्षण सुरू आहे.

या अभ्यासामध्ये पुलाची रचना, रस्त्यांच्या वाहतुकीवर त्याचा होणारा परिणाम आणि वाहनचालकांना होणारे फायदे यासर्व पैलूंचा समावेश आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल बीएमसीला सादर केला जाईल. त्यानंतर पुलाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया सुरू होईल.

New Flyover: गुड न्यूज! मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कुर्ला ते घाटकोपरपर्यंत तयार होणार उड्डाणपूल
Sinhgad Flyover: पुणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका; सिंहगड उड्डाणपूल सुरु; कोणाला होणार फायदा?

महत्वाचे म्हणजे, आगामी महानगर पालिका निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या पुलासाठी निविदा मागवण्याचे उद्दिष्ट बीएमसीकडून ठेवले आहे. या प्रोजेक्टमधील सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे पुलाच्या मध्यभागी असलेली नौदलाची जमीन. सुरुवातीला नौदलाकडून आक्षेप घेण्यात आला होता. कारण नौदलाची जमीन पुलापासून १० ते १२ मीटर अंतरावर होती.

या अडचणीमुळे महापालिकेचे काम काही काळासाठी थांबवण्यात आले होते. मागच्या दोन वर्षात बीएमसी आणि नौदलामध्ये पत्र व्यवहार झाला. नौदलाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आता या उड्डाणपुलाच्या प्रोजेक्टसाठी वेग आला आहे.

New Flyover: गुड न्यूज! मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कुर्ला ते घाटकोपरपर्यंत तयार होणार उड्डाणपूल
Nagpur Flyover : नागपूरमध्ये चक्क घराच्या बाल्कनीतून गेला उड्डाणपूल, अशोक चौकातील व्हिडिओ पाहिलात का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com