Sion Flyover: सायन उड्डाणपूल धोकादायक घोषित, अवजड वाहनांना बंदी; पर्यायी मार्गाचा वापर करा, BMC चे आवाहन

Mumbai News: शीव (सायन ) पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा शीव उड्डाणपूल मध्य रेल्वे प्राधिकरणाने धोकादायक घोषित केला.
सायन उड्डाणपूल धोकादायक घोषित, अवजड वाहनांना बंदी; पर्यायी मार्गाचा वापर करा, BMC चे आवाहन
Sion FlyoverSaam Tv
Published On

शीव (सायन ) पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा शीव उड्डाणपूल मध्य रेल्वे प्राधिकरणाने धोकादायक घोषित केला आहे. त्यामुळे शीव (सायन) उड्डाणपुलावरून अवजड वाहने आणि २.८० मीटरपेक्षा उंचीच्या वाहनांसाठी वाहतूक बंदी करण्यात आली आहे.

तसेच १७ जुलै २०२४ रोजी मोहरम सणानिमित्त वांद्रे, कुर्ला, धारावीसह अन्य भागातून मिरवणूक आयोजित करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर या भागात नागरिकांची मोठी वर्दळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नागरिकांनी या भागातील मार्गांवरुन प्रवास करणे टाळावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'जी उत्तर' विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

सायन उड्डाणपूल धोकादायक घोषित, अवजड वाहनांना बंदी; पर्यायी मार्गाचा वापर करा, BMC चे आवाहन
MPs Bungalow: सरकारी बंगला रिकामा करा! 200 माजी खासदारांना बजावण्यात आली नोटीस

मोहरम सणाच्या निमित्ताने दरवर्षी माहीम रेती बंदर येथे ताजिया विसर्जित करण्यासाठी मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. यंदाही अशाप्रकारच्या मिरवणुकीचे आयोजन होत असल्याने काही मार्गावर गर्दी होऊ शकते.

सायन उड्डाणपूल धोकादायक घोषित, अवजड वाहनांना बंदी; पर्यायी मार्गाचा वापर करा, BMC चे आवाहन
Pune News : आधी केली दारू पार्टी, नंतर नशेत घेतला गळफास; अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येने पुणे हादरलं

त्यामुळे, नागरिकांनी बुधवार, १७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजेपासून गुरूवार, दिनांक १८ जुलै २०२४ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत या कालावधीत 'जी उत्तर' विभागातील 'टी जंक्शन' ते कला नगर, ६० फूट रस्ता, ९० फूट रस्ता, एस. एल. रहेजा मार्ग, माहीम कॉज वे या मार्गावरुन वाहन नेणे किंवा प्रवास करणे शक्यतो टाळावे. तसेच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस व वाहतूक पोलीस यांच्याद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'जी उत्तर' विभागाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com