Political News  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : भाजपच्या विजयानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार? काँग्रेस आमदारांचा गट फुटण्याची शक्यता

Congress MLAs likley to split in Maharashtra : चार राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेस बॅकफुटवर जाण्याची शक्यता आहे.

प्रविण वाकचौरे

सुनील काळे

Mumbai News :

देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काल समोर आले आहेत. चार पैकी तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपमध्ये स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. या विजयामुळे काँग्रेस पुन्हा एकदा पिछाडीवर गेली आहे.

चार राज्यांच्या निवडणूक निकालांनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या या मोठ्या विजयानंतर काँग्रेस आमदारांचा मोठा गट भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्ये मोठ्या फुटीचा अंदाज वर्तवला जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सूत्रांच्या माहितीनुसार, आधीच काही काँग्रेस आमदार भाजपच्या संपर्कात होते. मात्र कालच्या भाजच्या विजयानंतर त्यांना ग्रीन सिग्नल मिळाल्याचं बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे येत्या काळात राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

महाविकास आघाडी बॅकफूटवर

चार राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेस बॅकफुटवर जाण्याची शक्यता आहे. विद्यमान १८ जागांवर ठाकरे गटाचा दावा तर पवार गट १५ जागा लढण्यासाठी‌ आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. उरलेल्या जागांवर काँग्रेसला समाधानी राहावं लागण्याची चिन्हं आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT