Police arrest three, including MLA Shankar Mandekar’s brother, in Daund art center firing case. Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Pune : दौंडमध्ये कला केंद्रात अंदाधुंद गोळीबार, सत्ताधारी आमदाराच्या भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

MLA Shankar Mandekar’s brother : दौंडमधील कला केंद्रातील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यामध्ये भोरमधील आमदाराच्या भावाचा समावेश आहे. पोलिसांकडून सध्या या घटनेचा तपास केला जात आहे.

Namdeo Kumbhar

  • दौंडमधील न्यू अंबिका कला केंद्रात सोमवारी रात्री गोळीबाराची घटना घडली.

  • या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.

  • अटक करण्यात आलेल्यांमध्ये आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊही आहे.

  • राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाच्या दडपणावरून राज्य सरकारवर टीका केली.

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Bhor MLA Shankar Mandekar’s brother arrested in Daund shooting case : पुण्यातील दौंडजवळच्य कलाकेंद्रात अंदाधुंद गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये भोरचे अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावालाही अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री येथील न्यू अंबिका कला केंद्रामध्ये गोळीबार झाला होता. त्यामध्ये एक तरूणी जखमी झाली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून हे प्रकरण दाबण्यात येत असल्याची टीका केली होती. रोहित पवार यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावरून स्थानिकांनी नाराजी व्यक्त करण्यात येत होती. राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. आज पुणे ग्रामीण पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये शंकर मांडेकर यांच्या भावाचाही समावेश आहे.

दौंडमधील न्यू अंबिका कला केंद्रामध्ये झालेल्या गोळीबारप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. एका आरोपीचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दौंडमधील कला केंद्र व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून यवत पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल आहे होता.

कोण कोण अटकेत ?

दौंडजवळच्या न्यू अंबिका कला केंद्रामध्ये सोमवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास गोळीबार झाला होता. या गोळीबारात रोहित पवार यांनी एक महिला जखमी झाल्याचा दावा केला होता. पण पोलिसांकडून कुणीही जखमी झालेले नाही, असे सांगण्यात आले आहे. कला केंद्रातील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप या दोघांसह आणखी एका अनोळखी व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी चंद्रकांत मारणे फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. दौंडमधील यवत पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहे.

पुण्यातील दौंडमध्ये गोळीबार कुठे झाला?

दौंडजवळच्या न्यू अंबिका कला केंद्रामध्ये सोमवारी रात्री गोळीबार झाला.

गोळीबार प्रकरणी पोलिसांनी किती लोकांना अटक केली?

दौंडमधील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून चौथा आरोपी चंद्रकांत मारणे फरार आहे.

दौंडमधील गोळीबार प्रकरणातील अटकेतील आरोपी कोण आहेत?

बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप आणि एक अनोळखी इसम; मांडेकर हे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ आहेत.

दौंडमधील गोळीबार प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया कोणत्या नेत्यांनी दिल्या?

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून या प्रकरणावर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Beed News: धनंजय मुंडेंचं आयुष्य उद्ध्वस्त करून वाल्मिक कराडला मंत्री व्हायचं होतं – बाळा बांगरांचा गंभीर दावा|VIDEO

Mumbai To Kargil : मुंबई ते कारगिल प्रवास कसा करायचा? जाणून घ्या मार्ग, आणि एकूण खर्च

IRCTC Rule: रेल्वेचा मोठा निर्णय! तब्बल २.५ कोटी युजर्सचे अकाउंट केले निष्क्रिय; या नियमात केले बदल

धोनी, कोहली अन् सचिनची वार्षिक कमाई किती? आकडा पाहून बसेल धक्का; रवी शास्त्री म्हणाले..

SCROLL FOR NEXT