Bhiwandi Accident News  saam tv
मुंबई/पुणे

Accident : स्वातंत्र्यदिनासाठी निघाला, बाईक स्लीप झाली अन् कंटेनरच्या खाली आला, विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत

Bhiwandi Accident News : भिवंडी वाडा महामार्गावर भीषण अपघात झाला. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थ्यांचा कंटेनरच्या खाली येऊन दुर्दैवी अंत झाला.

Yash Shirke

  1. भिवंडी वाडा मार्गावर शेलार येथे बाईक स्लिप होऊन वैद्यकीय विद्यार्थ्याचा कंटेनरखाली सापडून जागीच मृत्यू.

  2. मृत तरुणाची ओळख २३ वर्षीय रेहमान अली शेख अशी असून तो स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी कॉलेजकडे जात होता.

  3. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या काँक्रीट पट्टीवर घसरल्याने भीषण अपघात घडला.

फैयाज शेख, साम टीव्ही, प्रतिनिधी

Bhiwandi : भिवंडी येथून एक दु:खद बातमी समोर आली आहे. भिवंडी वाडा महामार्गावील शेलार येथे भीषण अपघात झाला. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या काँक्रीट पट्टीवर स्लिप होऊन एक विद्यार्थी कंटनेरच्या खाली आला. या अपघातात विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. हा तरुण वैद्यकीय शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेहमान अली रोशन अली शेख (वय - २३ वर्षे) असे अपघातामध्ये दुर्दैवी अंत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुंब्रा येथून दुगाड फाटा गावातील त्याच्या कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिवस साजरा करण्यासाठी गेला होता. कॉलेजमध्ये जात असताना भिवंडी वाडा महामार्गावर त्याची दुचाकी स्लिप झाला आणि त्याचा अपघात झाला.

आज (१५ ऑगस्ट) सकाळी रेहमान त्याच्या घरातून वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी मुंब्राहून भिवंडी तालुक्यातील होमियोपेथीक कॉलेजमध्ये जात होता. भिवंडी वाडा मार्गावर शेलार गावाजवळ त्याची बाईक स्लिप झाली आणि बाजूने जाणाऱ्या कंटेनरच्या चाकाखाली येऊन रेहमानचा जागीच मृत्यू झाला.

भिवंडी वाडा मार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात २३ वर्षीय रेहमान अली शेख या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्देवी अंत झाला. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी तो घरातून कॉलेजला जात होता. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या काँक्रीट पट्टीवर स्लिप होऊन त्याचा अपघात झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

SCROLL FOR NEXT