Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे कार्यकर्ते आमनेसामने, पालकमंत्र्याच्या बैठकीत राडा; नेमकं काय झालं? VIDEO

Maharashtra Political News : धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पवनचक्की ठेकेदार आणि शेतकऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ठाकरे-शिंदे गट आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsx
Published On

बालाजी सुरवसे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : धाराशिवमध्ये पालकमंत्र्याच्या बैठकीमध्ये गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. या बैठकीमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट हे आमनेसामने आले. दोन्ही गटातील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. सुरु असलेला वाद धाराशिवचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिटवला.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पवनचक्की ठेकेदार आणि शेतकरी यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. बैठकीदरम्यान एका मुद्यावरुन ठाकरे गट आणि शिंदे गट हे दोन्ही गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : भाजपला धक्का! आमदाराचे काका शिंदे गटाच्या वाटेवर, एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार

बैठकीदरम्यान ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना शिंदे गटाचे आनंद पाटील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्तेही आमनेसामने आले. शेवटी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आनंद पाटील यांच्यामध्ये सुरू असलेला वाद पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मिटवला.

Maharashtra Politics
Jalna : स्वातंत्र्यदिनी आंदोलन करणाऱ्याच्या कमरेत पोलीस अधिकाऱ्याने घातली लाथ, व्हिडीओ व्हायरल

'तुम्ही दोन्ही बाजूने बोलता, तुमचे मामा पवनचक्कीची गुत्तेदारी करतात आणि तुम्ही पवनचक्की वाल्यांना दाब देता असं दोन्हीकडून ढोलकी वाजवू नका', असे म्हणत बैठकीमध्येच शिवसेनेचे आनंद पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वातावरण तापू लागले. तेव्हा प्रताप सरनाईकांनी मध्यस्थी केले.

Maharashtra Politics
Pune Duand : आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवलं; दौंडमध्ये भयकंर घडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com