Kapil Patil News Saam tv
मुंबई/पुणे

Kapil Patil News : केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर भिवंडी पोलिसांत गुन्हा; काय आहे प्रकरण?

Kapil Patil Latest News : केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर भिवंडी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील मतदानाच्या दिवशी भिवंडीतील मतदान केंद्रावर गर्दी कशाला, असा प्रश्न विचारत आक्रमक झाल्याचे दिसले होते.

Vishal Gangurde

फैय्याज शेख, साम टीव्ही प्रतिनिधी

भिवंडी : केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर भिवंडी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील मतदानाच्या दिवशी भिवंडीतील मतदान केंद्रावर गर्दी कशाला, असा प्रश्न विचारत आक्रमक झाल्याचे दिसले होते. या प्रकारानंतर राजकीय नेत्यांनी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. आमदार रोहित पवार यांनी या संदर्भातील व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला होता. त्यानंतर आता त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आलाय.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना मतदान केंद्रावर पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे भोवले आहे. भिवंडीमधील शांतीनगर पोलीस ठाण्यात कपिल पाटील यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कपिल पाटील यांच्यासहित हर्षल पाटील, रवी सावंत, विश्व हिंदू परिषदेचे दादा गोसावी यांच्या विरोधात मतदान केंद्राबाहेर शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आयपीसी 186, 504,506 अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

रोहित पवार यांनी काय टीका केली होती?

रोहित पवार यांनी भिवंडीतील कपिल पाटील यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तसेच रोहित पवार यांनी टीका केली होती. रोहित पवार पोस्ट करत म्हटलं की, 'केंद्रीय मंत्री भिवंडी मतदारसंघातील भाजप उमेदवार पोलीस अधिकाऱ्यांना अत्यंत खालच्या पातळीवर शिव्या देतात. सागर बंगल्यावर बसलेल्या त्यांच्या बॉसचे विशेष संरक्षण असल्याने ही मस्ती येत असावी. असो, पण हा अहंकार चार जूनला उतरल्याशिवाय राहणार नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: आमदार-खासदारांसोबत कसं वागावं? अधिकाऱ्यांसाठी 9 कलमी राजेशाही फर्मान

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

अजित पवारांच्या आमदारावर अटकेची टांगती तलवार? राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Success Story: १० बाय १०च्या खोलीत फुलवली केशरची शेती, संभाजीनगरच्या लेकीचा यशस्वी प्रयोग

Maharashtra Politics: बड्या नेत्यांना हवं भाजपचं वाशिंग मशिन? मित्र पक्षांनाही भाजपची भुरळ

SCROLL FOR NEXT