Bhiwandi Lok Sabha: भिवंडी लोकसभेतील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला, कारचीही केली तोडफोड

Bhiwandi News: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू असताना भिवंडीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे.
भिवंडीत निलेश सांबरे यांच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला, कारचीही केली तोडफोड
Nilesh Sambare Party Worker Assaulted at bhuvan in murbad taluka Saam Tv

फय्याज शेख, साम टीव्ही, भिवंडी प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू असताना भिवंडीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. सांबरे यांच्या दोन कार्यकर्त्यांवर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मुरबाड तालुक्यातील भुवन येथे ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतचे माजी सरपंच दौलत बांगर आणि जयवंत बांगर हे निलेश सांबरे यांचे काम करत असल्याच्या रागातून त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या चार चाकी वाहनाची सुद्धा तोडफोड केली आहे.

भिवंडीत निलेश सांबरे यांच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला, कारचीही केली तोडफोड
Devendra Fadnavis: सर्वात आधी आम्हीच EC कडे तक्रार केली, उद्धव ठाकरेंचे नेहमीचेच रडगाणे: देवेंद्र फडणवीस

सध्या जखमींना मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा जीवघेणा हल्ला भाजपच्याच कार्यकर्त्यांनी केलं असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सकाळपासून मुरबाडमध्ये मतदान शांततेत पार पडले असून दुपारनंतर मात्र वातावरण तंग झाले असल्याने मतदान व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची कसोटी लागणार आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अंदाजे 48.89 टक्के मतदान

दरम्यान, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात आज सकाळी 7.00 वाजल्यापासून सुरुवात झाली. 23 भिवंडी मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 48.89 टक्के मतदान झाले आहे.

भिवंडीत निलेश सांबरे यांच्या कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला, कारचीही केली तोडफोड
Uddhav Thackeray: पहाटे 5 वाजले तरी मतदान करा, रांगेतून हटू नका; उद्धव ठाकरे यांचं मतदारांना आवाहन

ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे:

134 भिवंडी ग्रामीण – 58.00 टक्के

135 शहापूर – 50.99 टक्के

136 भिवंडी पश्चिम – 47.80 टक्के

137 भिवंडी पूर्व – 43.37 टक्के

138 कल्याण पश्चिम –43.00 टक्के

139 मुरबाड – 51.18 टक्के

ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com