Bhiwandi Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Bhiwandi News: गाणी लावण्यावरून २ गटात वाद, हॉटेलमध्ये तुंबळ हाणामारी अन् गोळीबार; ११ जणांना अटक, थरारक VIDEO व्हायरल

Bhiwandi Crime: भिवंडीतील ह़ॉटेलमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. एका गटाकडून गोळीबार तर दुसऱ्या गडाकडून चॉपर हल्ला करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More
  • भिवंडीच्या त्विशा हॉटेलमध्ये गाण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी

  • हॉटेलमध्ये एका गटाकडून गोळीबार तर दुसऱ्या गटाकडून चॉपर हल्ला

  • भिवंडी हॉटेल हाणामारी प्रकरणात ११ जणांना अटक

फैय्याज शेख, भिवंडी

भिवंडीतील हॉटेलमध्ये गाणं बदलण्यावरून झालेल्या वादात थेट पिस्टलमधून गोळीबार आणि चॉपरने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे येथील त्विशा हॉटेलमध्ये मध्यरात्री दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. सुरुवातीला गाण्यावरून झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यानंतर एका गटाकडून पिस्टलमधून गोळीबार करण्यात आला तर दुसऱ्या गटाकडून चॉपरने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या संपूर्ण राड्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलिसांनी दोन्ही गटांतील एकूण ११ आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथील त्विशा हॉटेलमध्ये मध्यरात्री हा प्रकार घडला. हॉटेलमध्ये मुसा भाईचे गाणे सुरू असताना एका गटाने ते बंद करून मराठी गाणे लावण्यास सांगितले. मात्र, यावरून दुसऱ्या गटासोबत वाद सुरू झाला. साऊंड बॉक्स उचलून दुसऱ्या टेबलाजवळ नेण्यावरून वाद आणखीन चिघळला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची आणि शिवीगाळ झालीा त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

वाद विकोपाला गेल्यानंतर एका गटातील साईनाथ पाटीलने कमरेला लावलेले पिस्टल बाहेर काढून समोरच्या गटाच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप आहे . तर दुसऱ्या गटाच्या तक्रारीनुसार, चॉपर काढून हल्ला करण्यात आला. या झटापटीत काही जण जखमी झाले. हॉटेलमधील हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे हॉटेलमध्ये आलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.

या घटनेप्रकरणी भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या गुन्ह्यात ५ जणांची नावे, तर दुसऱ्या गुन्ह्यात ३ आरोपींसह सात ते आठ अनोळखी व्यक्तींचा उल्लेख आहे. या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. गाणी लावण्याच्या वादातून सुरू झालेल्या हाणामारीत थेट गोळीबार आणि चॉपर हल्ला झाल्याने भिवंडीत एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास भिवंडी तालुका पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Of India : गृह आणि वाहनकर्ज झालं स्वस्त; बँक ऑफ इंडियानं आणली भन्नाट ऑफर

Maharashtra News Live Update : पायल झांबरे मृत्यू प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी - नीलम गोऱ्हे

Sitafal : चुकूनही फेकू नका सीताफळाची साल; स्किन केअरसाठी करा वापर, हिऱ्यासारखा चमकेल चेहरा

घरच्या घरी बनवा नॅचरल फ्लोअर क्लीनर: फरशी चमकेल काचेसारखी

Death Symptoms: मृत्यूच्या २४ तास आधी शरीर देतं हे ३ संकेत! हॉस्पिस नर्सने सांगितला धक्कादायक अनुभव

SCROLL FOR NEXT