पवारांच्या गोविंदबागेत AIचा चमत्कार; एकरी 120 टन उसाचं उत्पादन

AI Revolution in Agriculture: शरद पवारांच्या गोंविद बागेत उसाचं एकरी १२० टन उत्पादन घेण्यात आलं. नेमकं कशामुळे हे तिप्पट उत्पादन झालं? पवारांनी नेमका कशाचा वापर केला? पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट.......
SHARAD PAWAR'S GOVIND BAUG
SHARAD PAWAR'S GOVIND BAUGsaam tv
Published On: 

माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा शेतीबद्दलचा अभ्यास आणि अनुभव सर्वश्रुत आहे. याच अनुभवातून आता आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये प्रभावी वापर केल्यास उत्पादनात कशी मोठी क्रांती घडवता येते, याचा प्रत्यय बारामतीतील गोविंद बागेत आलाय..AI तंत्रज्ञानाच्या मदतीने गोविंद बागेत यंदा एकरी सरासरी 120 टन ऊसाचं उत्पादन घेण्यात आलयं... गेल्या 15 वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत एकरी तब्बल 60 टनांची वाढ झालीय. AIवर आधारित हा प्रयोग आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवी दिशा देणारा ठरणार आहे...

पवारांच्या गोविंदबागेत AIचा चमत्कार

बारामतीच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानामुळे एकरी सरासरी 120 टन ऊस उत्पादन

15 वर्षांच्या 60 टन सरासरी उत्पादनाच्या तुलनेत थेट दुप्पट वाढ

हवामान, पाणी आणि खतांच्या अचूक नियोजनासाठी AIचा प्रभावी वापर

आधुनिक तंत्रज्ञानामुळे पीक व्यवस्थापनात अचूकता आणि उत्पादन खर्चावर नियंत्रण

गोविंद बागेतील यशस्वी प्रयोग शेतकऱ्यांसाठी नवी दिशा देणारा ठरणार

शेतीतील AIच्या या आधुनिक प्रयोगामुळे केवळ उत्पादनातच वाढ झाली नाही, तर पाण्याची मोठी बचत होण्यास आणि खतांचा योग्य वापर करण्यासही मदत झालीय...अध्यक्ष प्रतापराव पवारांच्या मार्गदर्शनाखाली ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून शेतीतल्या AIची प्रणाली शेतकरी वर्गासाठी उपलब्ध करून दिली. आणि कृषी क्षेत्रातल्या क्रांतीचं नवं पर्व सुरू झालं. आणि त्यामुळेच गोविंद बागेत राबवण्यात आलेला हा यशस्वी प्रकल्प आता बारामतीसह संपूर्ण राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आदर्श मॉडेल ठरू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.